Pune Crime | शमुखवाडी येथे तरुणाचा खून, मृतदेह फेकला ओढ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 04:15 PM2023-02-15T16:15:35+5:302023-02-15T16:20:01+5:30

पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अज्ञात इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला...

Youth killed in Shamukhwadi, body thrown in stream pune crime latest news | Pune Crime | शमुखवाडी येथे तरुणाचा खून, मृतदेह फेकला ओढ्यात

Pune Crime | शमुखवाडी येथे तरुणाचा खून, मृतदेह फेकला ओढ्यात

Next

चाकण (पुणे) : कोणीतरी अज्ञात इसमांनी कोणत्या तरी अज्ञात कारणावरून खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील देशमुखवाडी येथे एका ४० ते ४२ वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हल्लेखोरांनी संबंधित तरुणाचा मृतदेह पडीक जमिनीच्या ओढ्यात फेकून दिला. देशमुखवाडी येथे शनिवारी (दि. ११) दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून, महाळुंगे इंगळे पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अज्ञात इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

राजू किसन राठोड (वय ४२, रा. सारासिटी, खराबवाडी, चाकण) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. देशमुखवाडी येथील बाळू निवृत्ती देशमुख यांच्या मालकीच्या पडीक जमिनीलगत असलेल्या ओढ्यात हा मृतदेह फेकून देण्यात आला. मारेकऱ्यांसह मयत इसमाचे नाव, गाव व पत्ता अद्याप निष्पन्न झालेले नाही. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सारंग चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Youth killed in Shamukhwadi, body thrown in stream pune crime latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.