खेड तालुक्यात शस्त्राने वार करून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 17:16 IST2022-06-26T17:16:18+5:302022-06-26T17:16:28+5:30

तरुण दुचाकीवरून जाताना एकांताचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी केले वार

Youth killed in Khed taluka | खेड तालुक्यात शस्त्राने वार करून तरुणाचा खून

खेड तालुक्यात शस्त्राने वार करून तरुणाचा खून

शेलपिंपळगाव : रासे (ता.खेड) येथील वन विभागाच्या कच्चा रस्त्यावर अज्ञात इसमांनी ३४ वर्षीय तरुणाचा मानेवर व डोक्यावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने वार करून खुन केला. 

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवार (दि.२४) ते शनिवारच्या (दि.२५) दरम्यान घडली आहे. शशिकांत शिवाजी काशिद (वय ३४ वर्षे, रा. मातोश्री पार्क, रासे, ता. खेड, जि. पुणे) असे हल्ल्यात खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शशिकांत काशीद हे वनविभाग हद्दीतील रस्त्याने आपल्या दुचाकीवरून फिल्टर दुस्तीच्या कामासाठी जात होते. दरम्यान एकांताचा फायदा घेऊन अज्ञात हल्लेखोरांनी अज्ञात कारणांसाठी त्याचे मानेवर व डोक्यावर कोणत्या तरी धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खुन केला. याप्रकरणी प्रशांत शिवाजी काशीद (वय ३२१) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Web Title: Youth killed in Khed taluka