डंपरखाली सापडून तरुणाचा मृत्यू, कोंढवा परिसरातील अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 11:32 IST2023-12-08T11:31:49+5:302023-12-08T11:32:10+5:30

पुणे : रस्त्यावर झाेपलेल्या तरुणाचा डंपरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना कोंढवा भागातील टिळेकनगर परिसरात घडली. याप्रकरणी कोंढवा ...

Youth found dead under dumper, accident in Kondhwa area | डंपरखाली सापडून तरुणाचा मृत्यू, कोंढवा परिसरातील अपघात

डंपरखाली सापडून तरुणाचा मृत्यू, कोंढवा परिसरातील अपघात

पुणे : रस्त्यावर झाेपलेल्या तरुणाचा डंपरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना कोंढवा भागातील टिळेकनगर परिसरात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी भरत गोपाळ चंदेवाड (वय ५० रा. कोंढवा बुद्रुक) या डंपर चालकाला अटक केली आहे. याबाबत पोलिस हवालदार राजेंद्र खामकर यांनी फिर्याद दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी दुपारी सव्वातीनच्या सुमारास डंपर टिळेकरनगर परिसरातून निघाला होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक अनोळखी तरुण झोपला होता. डंपरच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्युमुखी पडलेला तरुण अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील असून, त्याची ओळख पटलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक कुदळे तपास करत आहेत.

Web Title: Youth found dead under dumper, accident in Kondhwa area