ST बस-दुचाकीच्या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू; पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 19:46 IST2022-12-27T19:44:04+5:302022-12-27T19:46:29+5:30
एसटी बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना तो एसटी बसच्या पाठीमागील चाकाखाली पडला...

ST बस-दुचाकीच्या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू; पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना
यवत (पुणे) :पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बस व दुचाकीच्या अपघातात २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (दि. २७) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सहजपूर (ता. दौंड) गावच्या हद्दीत घडला.
हर्षद अनिल पांगारकर (रा. पांगारे वस्ती, सहजपूर, ता. दौंड )असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार हर्षदा दुचाकीवरून उरुळी कांचनकडे निघालेल्या होत्या. सहजपूर फाट्याजवळ एसटी बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना तो एसटी बसच्या पाठीमागील चाकाखाली पडला. बसच्या पाठीमागील चाकाखाली त्याचा चेहरा व डोके आल्याने त्याचा गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तत्काळ त्याला यवत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.