तिकोणा किल्ल्यावरुन पडल्याने युवकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 17:25 IST2019-12-18T17:25:03+5:302019-12-18T17:25:37+5:30

२५० फुट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्रला यश 

Youth died after falling from a trikona fort | तिकोणा किल्ल्यावरुन पडल्याने युवकाचा मृत्यू 

तिकोणा किल्ल्यावरुन पडल्याने युवकाचा मृत्यू 

ठळक मुद्देघटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम व लोणावळा ग्रामीण पोलीस गडावर दाखल

लोणावळा : पवन मावळातील तिकोणा किल्ला (वितंडगड) या किल्ल्यावरुन आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात ' शिवदुर्ग मित्र ' या लोणावळ्यातील रेस्कू टिमला चार वाजण्याच्या सुमारास यश आले. वरण तळ्याची मागील बाजुच्या वुरुजावरुन सुमारे २५० फुट खोल हा युवक पडला होता. हार्दिक विक्रम माळी (वय 20, रा. इम्प्रेस टॉवर, घोरपडी पुणे) असे या युवकाचे नाव आहे.
  मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणारे काही युवक आज सकाळच्या सुमारास तिकोणा किल्ल्यावर फिरायला गेले होते. यावेळी हार्दिक माळी या युवकाचा बाले किल्ल्यावरुन तोल गेल्याने तो खाली पडला होता. ही माहिती समजाच तिकोना किल्ल्यावर गड संवर्धनाचे काम करणारे मनोहर सुतार व गुरुदास मोहोळ व वनपाल हे युवक सकाळपासून सदर युवकाचा शोध घेत होते मात्र त्यांना शोध लागला नाही.
   या घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम व लोणावळा ग्रामीण पोलीस गडावर दाखल होत शोध व बचाव कार्य सुरू केले, चार वाजण्याच्या सुमारास त्यांना दरीत मृतदेह मिळून आला असून तो बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

Web Title: Youth died after falling from a trikona fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.