शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या धडकेत शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 18:37 IST

मुलाच्या डोक्यावरून पीएमपीएलचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला...

पुणे : परभणीवरुन मामाकडे पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या चौदा वर्षांच्या मुलाचा दुचाकीवरून जाताना पीएमपीएल बसने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की, त्यात मुलाच्या डोक्यावरून पीएमपीएलचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. सोलापूर रोड वरील शेवाळवाडी फाटा येथे ही घटना घडली. अजय नामदेव राठोड (वय १४,  रा. फुरसुंगी ता. हवेली) असे अपघातीमृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्याचा मामा अनिल आडे (रा. फुरसुंगी, ता. हवेली) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपीएल चालक मेहबुब अकबर सैय्यद (वय ३८, रा. वडगाव-रसाई ता. हवेली) याला अटक केली आहे.अजय हा परभणी येथून त्याचा मामा अनिल आडे यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आला होता. तो सध्या बेकराईनगर येथील शाळेत इयत्ता सातवीत शिकत होता. बुधवारी (दि. ३१) रोजी अजय हा मामा अनिल यांच्या दुचाकीवरून लोणी येथून हडपसरच्या दिशेने येत असताना सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी फाट्याच्या पुढे जय भवानी ट्रेडर्स अ‍ॅण्ड हार्ड वेअर जवळ सैय्यद चालवत असलेल्या पीएमपीएल बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये अजय हा रस्त्यावर उजव्या बाजूला तर अनिल हे डाव्या बाजूला पडले. मागून घाईने निघालेल्या बसच्या मागच्या चाकाखाली अजय आला. त्याच्या डोक्यावरूनच पीएमपीएलचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. दुचाकीवर प्रवास करित असताना दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. गुन्ह्याचा तपास हडपसर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षा बांबे करित आहेत.  

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूStudentविद्यार्थीPMPMLपीएमपीएमएल