Pune Crime: तरुणाची विहिरीत आत्महत्या; ‘सीसीटीव्ही’ने झाला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 09:08 IST2023-11-06T09:08:19+5:302023-11-06T09:08:32+5:30

ही घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली....

Youth commits suicide in well; It was revealed by CCTV Pune Crime news | Pune Crime: तरुणाची विहिरीत आत्महत्या; ‘सीसीटीव्ही’ने झाला उलगडा

Pune Crime: तरुणाची विहिरीत आत्महत्या; ‘सीसीटीव्ही’ने झाला उलगडा

पुणे : विहिरीत उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बाणेर येथे कळमकर चौकाजवळील विहिरीत घडली. स्वप्नील राऊत असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या आत्महत्येमागे मानसिक आजार व घरगुती वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली आहे. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

अधिक माहितीनुसार, स्वप्नील हा मूळ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सगळे झोपल्यावर स्वप्नीलने घरातून थेट विहीर गाठली आणि उडी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील मंडळींनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. त्यामुळे विहिरीशेजारच्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज पाहिले असता स्वप्नीलने स्वत: विहिरीत उडी मारल्याचे आढळले.

स्वप्नीलचे वडील, भाऊ शेजारच्या सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतात. तर स्वप्नील हा हिंजवडी येथील येथे एका कंपनीमध्ये कामाला होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याला मानसिक त्रास होत होता. त्याचबरोबर त्याच्या व्यसनामुळे घरात सतत भांडणे होत होती. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Web Title: Youth commits suicide in well; It was revealed by CCTV Pune Crime news