शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक?; ६९ प्रकरणांची चौकशी, ‘नोटा’चे काय?
2
‘बिनविरोध’वर गंडांतर; चेंडू आता हायकोर्टात, मनसेने दाखल केली याचिका, चौकशी करण्याची मागणी
3
काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
4
शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!
5
ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
6
आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा
7
भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
8
‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?
9
सत्ता अबाधित ठेवायला पक्ष, घर फोडत आहेत, आमच्या कामांचे श्रेय तुम्ही का घेता?: उद्धव ठाकरे
10
सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका
11
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मनमानीला अखेर चाप; निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचे ताशेरे
12
उमर खालीद, शरजिल इमामला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळाला; अन्य ५ जणांना जामीन
13
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला; एकाला अटक, हेतूची चौकशी सुरू
14
ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
15
Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
16
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
17
खुला प्रवर्ग कुणासाठी राखीव नाही, सरकारी नोकरीत निवड मेरिटवर व्हावी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
18
उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे
19
"तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडी देतील"; तानाजी सावंतांचा भाजपासह पाटलांवर टीकास्त्र
20
निवडणूक आयोगाचा अजब कारभार, उमेदवाराचा AB फॉर्म गहाळ; अधिकाऱ्याला बसला फटका
Daily Top 2Weekly Top 5

मौजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तरुणास अटक; सात दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 18:08 IST

आरोपीवर चंदननगर पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल असून तो सराईत वाहनचोर आहे. 

ठळक मुद्देसिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी

धायरी: मौजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तरुणास सिंहगड रस्ता पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ८० हजार रूपये किंमतीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. महेश ऊर्फ मायकल नवनाथ कांबळे (वय २५ वर्ष, थिटे वस्ती, बैंक ऑफ बडोदाच्या पाठिमागे, खराडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या वाहनचोराचे नांव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीस प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यासाठी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पेट्रोलिंग करुन संशयित वाहनांची तपासणी करीत असताना तपास पथकातील कर्मचारी शंकर कुंभार व उज्ज्वल मोकाशी यांना मिळालेल्या बातमीवरुन सराईत वाहनचोर महेश कांबळे यांस नवले पुलाजवळ दुचाकीसह पकडुन चौकशी केली असता त्याच्या जवळची दुचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यास ताब्यात घेवून अधिक तपास केला असता तो सराईत वाहनचोर असल्याचे निष्पन्न झाले. त्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५ दुचाकी, लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ दुचाकी व तोफखाना पोलीस ठाणे, अहमदनगर हद्दीतील १ दुचाकी अशा तब्बल ७  दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीवर चंदननगर पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल असून तो सराईत वाहनचोर आहे.  

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्यासह पोलीस कर्मचारी मोहन भुरुक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, शंकर कुंभार,उजवल मोकाशी, सचिन माळवे, दयानंद तेलंगे पाटील, पुरुषोत्तम गुन्ला, अविनाश कोंडे, राहुल शेडगे, धनाजी धोत्रे, निलेश कुलथे, किशोर शिंदे, रफिक नदाफ, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Puneपुणेtheftचोरीtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिसArrestअटक