तुमची मजा त्यांच्यासाठी ठरते सजा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 07:53 PM2018-11-10T19:53:49+5:302018-11-10T19:56:09+5:30

फटाक्यांच्या अाताषबाजीचा फटका यंदाही पक्ष्यांना बसल्याचे चित्र अाहे.

Your fun is a punishment for them | तुमची मजा त्यांच्यासाठी ठरते सजा

तुमची मजा त्यांच्यासाठी ठरते सजा

googlenewsNext

पुणे :  सर्वाेच्च न्यायालयाने फटाक्यांच्या वेळेवर निर्बंध अाणले असले तरी यंदाही माेठ्याप्रमाणावर अाताषबाजी शहरात करण्यात अाली. माेठ्या अावाजांच्या फटाक्यांचा परिणाम हा पक्ष्यांवर हाेत असताे. तसेच हवेच्या हाेणाऱ्या प्रदूषणामुळे त्यांचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते. यंदा दिवाळीतफटाके उडविण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी लक्ष्मीपूजन अाणि त्यानंतर उडविण्यात अालेल्या फटाक्यांचा फटका पक्ष्यांना बसल्याचे चित्र अाहे. शहरातील अनेक ठिकाणांवरील पक्ष्यांचे प्रमाण दिवाळीनंतर कमी झाल्याचे निरीक्षण पक्षी संशाेधकांनी नाेंदवले अाहे. 

     फटाक्यांचा माेठ्या अावाजाचे तसेच हाेणाऱ्या प्रदूषणाचे माणसावर विपरीत परिणाम हाेत असतात. माणसापेक्षा जास्त परिणाम हे पक्षी व प्राण्यावर हाेत असतात. माेठ्या अावाजाच्या फटाक्यांमुळे खार तसेच चिमण्यांचा मृत्यू हाेण्याची शक्यता असते. तसेच घुबडा सारख्या पक्ष्याची श्रवणशक्ती अधिक असल्याने माेठ्या अावाजाच्या फटाक्यांमुळे त्यांना बहिरेपण येण्याची शक्यता असते. पुण्यात 35 पेक्षा अधिक जातीचे पक्षी अाढळतात. दिवाळीच्या अाधी त्यांचे शहरातील प्रमाण अाणि दिवाळीनंतरचे प्रमाण यात फरक झाला असल्याचे निरीक्षण पक्षी संशाेधक धर्मराज पाटील यांनी नाेंदविले अाहे. त्यांनी बिबवेवाडी भागाचे निरीक्षण केले असता, अाधीपेक्षा कमी पक्ष्यांची संख्या झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास अाले अाहे. तसेच पक्ष्यांबराेबरच प्राण्यांवरही फटाक्यांचे विपरीत परिणाम झाला अाहे. पाटील यांच्या निरीक्षणानुसार बिबवेवाडी भागात असणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवाळीनंतर कमी झाली अाहे. 

    शहरात पिंगळा, गव्हाणी प्रकारचे घुबड, रातवा पक्षी, दयाळ पक्षी, शिंपी पक्षी, नाचण पक्षी, सुभग पक्षी , काेतवाल पक्षी असे विविध प्रकारचे पक्षी अाढळतात. दिवाळीतील माेठ्या अावाजाच्या फटाक्यांमुळे या पक्ष्यांना हृद्यविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. तसेच काही पक्ष्यांचे क श्रवणशक्ती निकामी हाेत असते. त्याचबराेबर या काळात युराेपातील अनेकपक्ष्यांचे स्थलांतर भारतात हाेत असल्याने त्यांच्यावरही प्रदूषणाचा तसेच फटाक्यांचा परिणाम हाेत असताे. वाेब्लर जातीचे पक्षी खासकरुन युराेपातून भारतात येत असतात. हे पक्षी अंगठ्याच्या अाकाराचे असतात. त्यांच्या अन्न साखळीवर या फटक्यांमुळे परिणाम हाेत असताे. खार, साप, मुंगूस हे प्राणी सुद्धा फटाक्यांचे बळी ठरत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे जास्तीत जास्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे अावश्यक असल्याचे मत पक्षी संशाेधक व्यक्त करत अाहेत. 

Web Title: Your fun is a punishment for them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.