पोलीस रेड... सहा नर्तिकांसोबत तरुणांचा मध्यरात्रीपर्यंत अश्लील नाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 13:23 IST2024-04-08T13:23:42+5:302024-04-08T13:23:52+5:30

लोणावळ्यात १० जणांवर गुन्हा दाखल

Young people dance obscenely till midnight with six dancers in lonavala | पोलीस रेड... सहा नर्तिकांसोबत तरुणांचा मध्यरात्रीपर्यंत अश्लील नाच

पोलीस रेड... सहा नर्तिकांसोबत तरुणांचा मध्यरात्रीपर्यंत अश्लील नाच

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : शहरामध्ये एका बंगल्यात रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टमच्या तालावर नर्तिकांसोबत नाचत हुल्लडबाजी करत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दहा जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री १२ नंतर गुन्हा दाखल केला. यामध्ये सहा मुलींचा समावेश आहे.  पोलिसांची चाहूल लागताच काही तरुण पळाले. 

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक म्हणाले,  शहरात तुंगार्ली परिसरातील एस ४ नावाच्या बंगल्यातील प्रांगणात काही लोक सार्वजनिक शांततेचा भंग करून रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टम लावून मोठमोठ्याने गाणी लावून मुलींकडून अश्लील हावभाव करून नाच करायला लावत आहेत, अशी माहिती प्राप्त झाली होती. तत्काळ कारवाई करीत  यामध्ये ९ जणांना ताब्यात घेऊन साऊंड सिस्टम जप्त केले आहे.  
लोणावळा शहर व परिसरातील बंगले मालकांनी त्यांच्याकडील बंगले भाड्याने देताना बंगल्यामध्ये कोणतेही बेकायदेशीपणे कृत्य होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बंगला भाड्याने दिलेली माहिती पोलिस स्टेशनला सादर करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. भाड्याने दिल्या जाणाऱ्या बंगल्याची माहिती संकलित करण्याचे काम लोणावळा शहर पोलिस स्टेशनकडून करण्यात आले असल्याचे सांगितले.

Web Title: Young people dance obscenely till midnight with six dancers in lonavala