Pune Crime: पुण्यात इंजिनिअरकडून चाकूने भोसकून तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 21:03 IST2022-01-10T21:03:31+5:302022-01-10T21:03:37+5:30
बांधकाम सुरु असताना त्याचा कचरा शेजारच्या घरावर पडल्याने झालेल्या भांडणात एका इंजिनिअरने तरुणाच्या छातीत चाकूने भोसकून खून केला

Pune Crime: पुण्यात इंजिनिअरकडून चाकूने भोसकून तरुणाचा खून
पुणे : बांधकाम सुरु असताना त्याचा कचरा शेजारच्या घरावर पडल्याने झालेल्या भांडणात एका इंजिनिअरने तरुणाच्या छातीत चाकूने भोसकून खून केला. ही धक्कादायक घटना बिबवेवाडीतील सुखसागर नगर भाग मध्ये सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
शरद सीताराम पुरी (वय ३५, रा. सुखसागर नगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. बिबवेवाडी पोलिसांनी सचिन विठ्ठल कपटकर (वय ४६, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) याला अटक केली आहे.
याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीखक सुनील झावरे यांनी सांगितले की, पुरी आणि कपटकर हे सुखसागरनगर भाग २ मध्ये शेजारी शेजारी राहतात. पुरी हे व्यावसायिक असून कपटकर इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. सध्या त्याला कोणताही कामधंदा नाही. पुरी यांच्या घराचे बांधकाम सुरु असून त्याचा कचरा कपटकर यांच्या घरावर पडत होता. यावरुन आज सकाळी त्यांच्यात भांडणे झाली. त्यात रागाच्या भरात कपटकर याने पुरी यांच्या छातीत चाकूने वार केला. वर्मी घाव बसल्याने त्यात पूरी यांचा मृत्यु झाला.
बेवारस मृतदेह आढळला
इंदिरानगर चौकातील आम्रपाली पेट्रोल पंपाजवळील राजीव गांधी शॉपिंग सेंटरच्या पाठीमागील पार्किंगमध्ये पोलिसांना एक बेवासर मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे.