जाहिरातीच्या ३५ फूट उंचीच्या होर्डिंगवरून तरुणानं मारली उडी; पुणे रेल्वे स्थानकाजवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 08:20 PM2021-09-23T20:20:05+5:302021-09-24T19:04:47+5:30

तरुण जखमी अवस्थेत ससून मध्ये दाखल

Young man jumps off 35 foot high billboards Incident near Pune railway station | जाहिरातीच्या ३५ फूट उंचीच्या होर्डिंगवरून तरुणानं मारली उडी; पुणे रेल्वे स्थानकाजवळील घटना

जाहिरातीच्या ३५ फूट उंचीच्या होर्डिंगवरून तरुणानं मारली उडी; पुणे रेल्वे स्थानकाजवळील घटना

Next
ठळक मुद्देतरुणाला खाली आणण्याचा प्रयत्न करीत असताना मारली उडी

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या एका जाहिरातीच्या बोर्ड वरून एका अज्ञात तरुणानं उडी मारली. जवळपास ३५ फूट उंचीवरून त्यानं उडी मारल्यानं पायाला जखम झाली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. पोलिसांनी जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं आहे.

गुरुवारी दुपारी एक अनोळखी व्यक्ती स्थानकांच्या आवारात असल्येला एका जाहिरातीच्या मोठ्या होर्डिंग वर चढला. याची माहिती मिळताच घटनास्थळी आरपीएफ, लोहमार्ग पोलीस,स्थानिक पोलीस पोहोचले. त्याला खाली उतरवण्यासाठी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.

अग्निशामक दलाचे कर्मचारी संजय गायकवाड यांच्या सह अन्य दोन कर्मचाऱ्यांनी अन्य लोकांच्या मदतीने खाली मोठी जाळी घेऊन उभे राहिले. त्याच दरम्यान काही तरुण होर्डिंग वर चढून त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करीत असताना त्यानं खाली उडी मारली. यात तो जखमी झाला आहे. पुणे लोहमार्ग पोलिसांत याची नोंद झाली. 

Web Title: Young man jumps off 35 foot high billboards Incident near Pune railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app