Pune | पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 16:20 IST2023-02-11T16:16:53+5:302023-02-11T16:20:02+5:30
तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

Pune | पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रवींद्र चंद्रकांत किंद्रे (३५ रा. जिजाई प्लाझा, कुटे मळा, नऱ्हे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत किंद्रे (८० रा. नांदगाव भोर) यांनी फिर्याद दिली आहे.
रवींद्र आणि महिलेचे २०२० मध्ये लग्न झाले होते. विवाहानंतर तिची एका तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर तिने रवींद्रशी वाद घालून त्याला त्रास दिला. पत्नी आणि तिच्या मित्राने रवींद्रला मारहाण केली. दोघांच्या त्रासामुळे रवींद्रने गेल्यावर्षी १७ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव तपास करत आहेत.