Young man dies after being pulled into a machine while sowing beans | सोयाबीन मळताना मशीनमध्ये खेचल्याने तरूणाचा मृत्यू
सोयाबीन मळताना मशीनमध्ये खेचल्याने तरूणाचा मृत्यू

चाकण : रासे (ता.खेड) येथे एका शेतात मशीनवर सोयाबीन मळताना मशीनमध्ये खेचल्याने एका तरूणाचा दुदैवी मृत्यू झाला. अनिकेत उर्फ तुकाराम आनंदा वाडेकर (वय १९, रा. बापदेववस्ती, रासे, ता.खेड, जि. पुणे ) असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. चाकण पोलीस ठाण्यात अपघातीमृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. १५) सकाळी १०.३० च्या सुमारास रासे गावच्या हद्दीत विलास व दिलीप विठोबा मुंगसे यांच्या शेतात घडली. अनिकेत हा सकाळी शेतात सोयाबीन मळत होता. मशीमध्ये सोयाबीन टाकीत असताना घास पुढे सरकवतांना त्याचा हात  मशीनमध्ये अडकला. यामुळे त्याचे संपूर्ण शरिर मशीनमध्ये ओढले गेले. कटरमुळे त्यांच्या शरिराचा चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. अनिकेत आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे   गावावर शोककळा पसरली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Young man dies after being pulled into a machine while sowing beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.