पुण्याच्या तळेगाव दाभाडेत शर्टच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 18:16 IST2021-11-19T18:16:10+5:302021-11-19T18:16:17+5:30
मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम चालू असल्याने या संदर्भात कोणाला काही माहिती असल्यास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

पुण्याच्या तळेगाव दाभाडेत शर्टच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हिंदमाता भुयारी मार्गाजवळील ऑक्सिजनपार्क येथे एका अनोळखी युवकाने शर्टच्या साहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना शुक्रवारी (दि.१९) दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली. या संदर्भात राजेंद्र गणेशराम प्रसाद (वय ३५, रा. लिट्ल हार्ट, तळेगाव स्टेशन) यांनी येथील पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
मृत व्यक्तीचे अंदाजे वय २५ ते ३० वर्षे असून उंची ५ फुट ७ इंच आहे. पायात निळा पांढरा बूट असून अंगावर निळ्या रंगाची जीन्स पँट आहे. त्याच्याजवळ १९ तारखेचे तळेगाव रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्मचे तिकीट आढळले आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी दिली. या व्यक्तीच्या उजव्या दंडावर हनुमानाचे चित्र असून कोपरा जवळ नक्षी गोंदलेली आहे. तर उजव्या हाताच्या पंजावर जय सेवालाल असे गोंदलेले आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम चालू आहे. या संदर्भात कोणाला काही माहिती असल्यास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.