कल्याणीनगर येथे रस्ते खोदाईमुळे दुचाकी घसरुन तरुण व्यावसायिकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:25 IST2019-11-13T14:17:54+5:302019-11-13T14:25:58+5:30
अपघातासाठी जबाबदार दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी

कल्याणीनगर येथे रस्ते खोदाईमुळे दुचाकी घसरुन तरुण व्यावसायिकाचा मृत्यू
पुणे : कल्याणीनगर येथील गोल्ड अॅडलाब चौकात दुभाजकाला केलेल्या खोदाईमुळे दुचाकी घसरून झालेल्या गंभीर अपघातात तरूण व्यावसायिकाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. सुनिल मल्लेश गाजुल (वय 33 रा. विडी कामगार वसाहत,चंदननगर)यांचा मृत्यू झाला असून अपघातासाठी जबाबदार दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. सोमवार (दि.11) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. सुनिल यांचे लक्ष्मीरोड येथे वर्णरूपी साडी सेंटर हे दुकान आहे.