शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तू कार्यक्रम करतो, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? लांडगेंचा अजितदादांवर निशाणा, रोहित पवारांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:32 IST

बांगड्या भरल्या असे म्हणणं म्हणजे महिलांचा अपमान आहे. त्यांचा खरा चेहरा हळूहळू समोर येत आहे, ते थोडे घाबरलेले आहेत - रोहित पवार

पुणे : पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीवरून महायुती सरकारमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळत आहे. इथे प्रचारसभेतून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करू लागले आहेत. अजित पवारांनी पिंपरीतील आमदार, सत्ताधारी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांविरोधात थेट दंड थोपाटले आहेत. 

अजित पवार यांनी काही वर्षांपूर्वी एका आमदारावर टीका केली होती. मी ठरवलं तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. तू कसा आमदार होतो, तेच बघतो. असं ते म्हणाले होते. याचा आधार घेत आमदार महेश लांडगे यांनी जोरदार हल्लाबोल केला. आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी जर ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो, तर आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अरे आमच्या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत. याच तुझा कार्यक्रम करतील. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या! अशी टीका महेश लांडगे यांनी केली. 

त्या विधानावर पुण्यात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले असताना रोहित पवारांनी पलटवार केला आहे.  रोहित पवार म्हणाले, बांगड्या भरल्या असे म्हणणं म्हणजे महिलांचा अपमान आहे. त्यांचा खरा चेहरा हळूहळू समोर येत आहे. ते थोडे घाबरलेले आहेत. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल अशी टीका पवार यांनी त्यांच्यावर केली आहे. 

नागरिकांना योग्य न्याय देणार 

काही एजन्सींशी आम्ही चर्चा करत आहोत. पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. कचऱ्याचा मुद्दा आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे. गुन्हेगारी वाढताना आपण पाहू शकतो. वाहतूक कोंडीत पुण्याचा देशात चौथा क्रमांक लागतो. या सर्व मुद्द्यांवर लक्ष देत नागरिकांना योग्य न्याय कसा देता येईल, याचा विचार सुरू असल्याचे रोहित पवारांनी सांगितले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar Targeted; Landge's Retort, Rohit Pawar's Counter-attack Over Pimpri Election

Web Summary : BJP and NCP leaders clash over Pimpri-Chinchwad election. Landge criticizes Ajit Pawar's 'correct program' threat. Rohit Pawar defends women, slams Landge's remarks as disrespectful. Focus is on resolving Pune's traffic, waste, and crime issues.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारmahesh landgeमहेश लांडगेRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahayutiमहायुतीPimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६