तू माझी फक्त ट्रॉफी बायको आहेस...! पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पतीला कोर्टाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 09:40 IST2024-12-10T09:39:07+5:302024-12-10T09:40:20+5:30

पत्नीला अंतरिम पोटगी म्हणून दरमहा वीस हजार रुपये अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून अंतिम निकालापर्यंत तसेच घरभाड्यापोटी दरमहा दहा हजार रुपये द्यावे लागणार

You are my only trophy wife The court slaps the husband who leaves his wife in the wind | तू माझी फक्त ट्रॉफी बायको आहेस...! पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पतीला कोर्टाचा दणका

तू माझी फक्त ट्रॉफी बायको आहेस...! पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पतीला कोर्टाचा दणका

पुणे : तू माझी फक्त ट्रॉफी बायको आहेस, असे सांगून पत्नीचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करीत थेट लंडन गाठून पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. पत्नीला अंतरिम पोटगी म्हणून दरमहा वीस हजार रुपये अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून अंतिम निकालापर्यंत तसेच घरभाड्यापोटी दरमहा दहा हजार रुपये द्यावेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

पतीमार्फत पोटगी व घरभाडे मिळावे, यासाठी ॲड. प्रसाद निकम, ॲड. मन्सूर तांबोळी, ॲड. शुभम बोबडे व ॲड. प्राजक्ता बाबर यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. राकेश आणि स्मिता (दोघांचीही नावे बदललेली) यांची ओळख मेट्रोमोनियल साइटवरून झाली. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०२२ रोजी ते लग्नबंधनात अडकले. मात्र, लग्नाच्या काही दिवसानंतर राकेश हा थेट लंडन येथे त्याचा व्यवसाय सांभाळण्यासाठी गेला. सासरी तिचे छान स्वागत होईल, असे वाटले होते. पण तसे काहीच झाले नाही. राकेश लंडन येथून आपल्याला बोलावेल, असे स्मिताला वाटत होते. तो लंडन येथे स्थायिक - आयएलआर असल्यामुळे त्याकडे स्मिताला सोबत घेऊन जाण्याचा विकल्प होता. मात्र, त्याने तिचा साधारण विजा काढला. त्यामुळे तो नाकारण्यात आला. यादरम्यान, तिने राकेशकडे पत्नी असल्याचे दाखवत व्हिजा काढून सोबत राहण्याकरिता न्यावे, अशी विनंती केली. मात्र, राकेश याने त्याकडे वारंवार टाळाटाळ केली. तो लंडन येथेच राहात असल्याने स्मिताला नाइलास्तव आईकडे परतावे लागले. याखेरीज, त्याने तिला व तिच्या आई - वडिलांना नेहमी अपमानास्पद वागणूक दिल्यानंतर तिने कौटुंबीक हिंसाचारानुसार अर्ज दाखल केला.

चारचाकी आणि पौंडमध्ये कमावणाऱ्या पतीची पोटगी देण्याची कुवत

पत्नीने शपथेवर सर्व गोष्टी सांगितल्याने प्रथमदर्शनी कौटुंबीक हिंसाचार झाला आहे, ही बाब ग्राह्य धरता येते. उत्पन्न लपविण्यासाठी पतीने न्यायालयात त्याची मालमत्ता व दायित्व याचे शपथपत्र सादर केले नाही, असे गृहीत धरले. तरी, पत्नीने दाखविलेल्या कागदपत्रांनुसार पतीने २०२२ रोजी चारचाकी घेतली. याखेरीज, २०२३ मध्ये त्याचे उत्पन्न २ हजार ६०९ पौंड, वायटीडी १८ हजार ५३१ पौंड होते. त्यामुळे, पत्नीला घरभाडे व पोटगी देण्याची पतीची कुवत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

Web Title: You are my only trophy wife The court slaps the husband who leaves his wife in the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.