International Yoga Day: पुण्यात शाळांमध्ये योगदिन उत्साहात; विद्यार्थी - विद्यार्थिनींची योग प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 13:36 IST2022-06-21T13:35:52+5:302022-06-21T13:36:03+5:30
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्व विषद करून सांगितले

International Yoga Day: पुण्यात शाळांमध्ये योगदिन उत्साहात; विद्यार्थी - विद्यार्थिनींची योग प्रात्यक्षिके
पुणे : 'आंतरराष्ट्रीय योग दिना'चे औचित्य साधत शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने मंगळवारी सकाळी योग दिन साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्व विषद करून सांगितले.
जागतिक योगा दिनानिमित्त वडगाव बुद्रुक येथील ज्ञानसाधना विद्यामंदिर इंग्रजी माध्यम शाळेत सकाळी अतिशय आनंददायी वातावरणामध्ये शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांनी योगा करत योगा दिन साजरा केला. त्यावेळेस शाळा प्रशासक अनिल चौधरी व माध्यमिक मुख्याध्यापिका राजश्री बोबडे उपस्थित होत्या.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे सकाळी ७ वाजल्यापासून 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' चे आयोजन करण्यात आले होते. एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार, सचिव प्रा. इरफान शेख, 'आझम स्पोर्ट्स अकादमी'चे संचालक गुलझार शेख , पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. दोन हजारहून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनीनी आझम कॅम्पस येथे योग प्रात्यक्षिके सादर केली.