नदी नाला जवळ नसतानाही येरवड्यातल्या नागरिकांचा घरात आला पूर .. महापालिकेचा चुकीमुळे संसार उध्वस्त झाल्याची नागरिकांची तक्रार.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 02:15 PM2021-03-13T14:15:39+5:302021-03-13T15:04:28+5:30

महापालिकेचा कर्मचारी वॉल्व्ह मन चा चुकीमुळे तब्बल १० नागरिकांचा घरात पाणी शिरले.   अचानक आलेल्या पुराने नागरिकही गोंधळले आहेत. वाहिलेल्या ...

Yerawada residents houses flooded due to PMC workers mistake. | नदी नाला जवळ नसतानाही येरवड्यातल्या नागरिकांचा घरात आला पूर .. महापालिकेचा चुकीमुळे संसार उध्वस्त झाल्याची नागरिकांची तक्रार.

नदी नाला जवळ नसतानाही येरवड्यातल्या नागरिकांचा घरात आला पूर .. महापालिकेचा चुकीमुळे संसार उध्वस्त झाल्याची नागरिकांची तक्रार.

Next

महापालिकेचा कर्मचारी वॉल्व्ह मन चा चुकीमुळे तब्बल १० नागरिकांचा घरात पाणी शिरले.   अचानक आलेल्या पुराने नागरिकही गोंधळले आहेत. वाहिलेल्या पाण्याचा अक्षरशः धबधबा असल्यासारखं  दृश्य दिसत होतं 

पुणे महापालिकेच्या ठाकरसी हिल पाण्याच्या टाकीचा वॉल्व्ह शनिवारी पहाटे नादुरुस्त झाल्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या पाहणार पाण्याची गळती झाली. टेकडी खाली असणाऱ्या शंकर मंदिरासमोरील गवळीवाडा परिसरातील आठ ते दहा नागरिकांच्या घरात शिरले पाणी. पहाटेच्या सुमारास अचानक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. घरात गुडघाभर पाणी साचल्यामुळे संसार उपयोगी वस्तू तसेच इतर सामान पाण्याखाली गेले. 

ठाकरसी हिल पाण्याची टाकी पूर्ण भरल्यानंतर टाकीचा वॉल बंद न केल्यामुळे ओव्हरफ्लो झालेले पाणी हे टाकी मधून खाली घरांमध्ये शिरले. पाण्याचा प्रवाह खूप वेगात होता. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. यापूर्वी देखील अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत. टाकी भरण्याच्या वेळी लक्ष न दिल्यामुळे हे प्रकार वारंवार घडत आहेत. टाकीचा वॉल्व्ह बंद करताना नादुरुस्त झाल्यामुळे हा प्रकार घडला. सुमारे तासभरा नंतर वॉल ची दुरुस्ती करण्यात आली. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे संतप्त महिलांनी टाकीवर जाऊन वॉलमेनला या घटनेचा जाब विचारला. त्यामुळे घटनास्थळी येरवडा पोलिसांना पाचारण करावे लागले. पाणी पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार वारंवार घडत आहेत. तरीही त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 
 

 

Web Title: Yerawada residents houses flooded due to PMC workers mistake.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.