शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

पोलिसांच्या हलगर्जीपणाने कैदी पळाला; उपनिरीक्षकासहीत ५ कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 18:46 IST

कैद्याला मुलीच्या लग्नात उपस्थित राहणार्‍यासाठी उत्तर प्रदेशात नेले असताना तो राहत्या घरातून पळून गेला

ठळक मुद्देपोलीस दलाच्या शिस्तीच्या दृष्टीकोनातून ही बाबा गंभीर असून कर्तव्यात गंभीर चूक केल्यामुळे दलाची जनमानसात प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका

पुणे: येरवडा कारागृहातील कैद्याला मुलीच्या लग्नात उपस्थित राहणार्‍यासाठी उत्तर प्रदेशात नेले असताना कैदी पळून गेल्याने पोलीस उपनिरीक्षकासह ५ जणांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन निंबाळकर, पोलीस हवालदार बाळु मुरकुटे, कर्मचारी शरद मोकाते, महावीर सामसे, किशोर नेवसे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अपर पोलीस आयुकत जालिंदर सुपेकर यांनी आदेश काढला आहे.वेदप्रकाशसिंग विरेंद्रकुमार सिंग (रा. मु़ पो़ गोलवरा, जि़ सुलतानपूर, उत्तर प्रदेश) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे.

वेदप्रकाशसिंग हा येरवडा कारागृहात एका गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. मुलीच्या लग्नासाठी त्याला त्याच्या मुळगावी गोलवारा येथे उपस्थित राहण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षक यांनी ७ दिवसांची अभिवचन रजा मंजूर केली होती. त्यानुसार वेदप्रकाशसिंग याला लग्नकार्यास हजर ठेवण्यासाठी कारागृहाकडून आरोपी पार्टीची मागणी करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक सचिन निंबाळकर यांच्यासह पाच जणांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. तशी ऑर्डर १० मेला काढण्यात आली. आरोपी पार्टी कैद्याला घेऊन त्याच्या मुळ गावी गेले होते. १५ मे रोजी पहाटे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान कैदी वेदप्रकाशसिंग हा राहत्या घराच्या खिडकीच्या लोखंडी गजाचे स्क्रु काढून बाहेर असलेली जाळी कापून खिडकीमधून पळून गेला. 

याबाबत केलेल्या प्राथमिक विभागीय चौकशीत आरोपी पार्टीने केलेल्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे कैद्याने पलायन केल्याचे समोर आले. ही बाब पोलीस दलाच्या शिस्तीच्या दृष्टीकोनातून गंभीर आहे. कर्तव्यात गंभीर चूक केल्यामुळे पोलीस दलाची जनमानसात प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत ५ जणांना निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न