शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘वंदे मातरम’ रचनेची यंदा शताब्दी वर्षपूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 06:00 IST

आज प्रजासत्ताक दिनी शंभर वर्षांपूर्वीची प्रचलित चाल ऐकण्याची पुणेकरांना संधी

ठळक मुद्देआजपर्यंत या गीताला संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज गायकांनी विविध रागांमध्ये केले स्वरबद्ध प्रजासत्ताक दिनी सकाळी 10 वाजता गांधर्व महाविद्यालयात गायन

नम्रता फडणीस

पुणे : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केलेल्या  ‘वंदे मातरम’ या रचनेला  यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. शंभर वर्षांपूर्वी त्यांनी प्रचलित केलेल्या या राष्ट्रगीताची जुनी चाल ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. उद्या (26 जानेवारी)प्रजासत्ताक दिनी सकाळी 10 वाजता गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिर येथे हा योग जुळून आला आहे. ’वंदे मातरम’चे  सूर कानावर पडताच देशभक्तीसह मातृभूमीसमोर नतमस्तक होण्याची भावना मनात संप्रेरित होते. देशाप्रति जाज्वल्य अभिमानाचे स्फुरण चढते. बकिमचंद्र चँटर्जी यांनी शब्दबद्ध केलेले ’वंदे मातरम’ गीत  ‘देस’ रागात रचले गेले आहे हे सर्वश्रुत आहेच. आजपर्यंत या गीताला भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज गायकांनी विविध रागांमध्ये स्वरबद्ध केले. मास्तर कृष्णराव यांनी  ‘वंदे मातरम’ ची रचना झिंजोटी रागात गुंफली. मात्र सर्वप्रथम 1920 च्या सुमारास  पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी  ‘काफी’ रागात ही रचना बांधली.  या रागातून शरणागत भाव प्रतीत होईल असे त्यांचे ठाम मत होते. स्वत: पं. पलुसकर ही रचना स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रत्येक काँग्रेस अधिवेशनात उपस्थित राहून सादर करीत होते. जाहीर सभेनंतर  ‘वंदे मातरम’ म्हणण्याची प्रथा  पलुसकरांनी सुरू केली. त्या नंतर त्यांचे शिष्य पं. विनायकबुवा पटवर्धन ही रचना लोकमान्य टिळकांच्या सभांमध्ये सादर करीत असत. या रचनेला जवळपास 100 वर्षे पूर्ण होत आहेत. प्रजासत्ताक दिनी संगीताचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांना या गीताद्वारे मानवंदना आणि आदरांजली वाहिली जाणार असल्याचे पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या शिष्या आणि माधुरी संगीत विद्यालयाच्या संचालिका  गुरू डॉ. माधुरी डोंगरे यांनी  ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ‘नादमाधुरी’ या आमच्या यू ट्यूब चॅनलवरून हे गीत प्रदर्शित होणार असून, पं. शौनक अभिषेकी आणि धनश्री गणात्रा यांनी हे गीत गायले असल्याचेही त्या म्हणाल्या.     पं. विष्णु दिगंबर पलुसकर यांचे हिंदुस्थानी संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी जी स्वरलिपी तयार केली ती आज  ‘पलुस्कर पद्धती’ म्हणून ओळखली जाते. 1901 साली पलुस्कर यांनी लाहोर येथे  ‘गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर  पलुस्कर यांनी  त्यांचे शिष्य पं. यशवंतबुवा मिराशी, पं. विनायकराव पटवर्धन, शंकर व्यास, बी.आर देवधर, ओंकारनाथ ठाकूर, शंकरराव बोडस यांना भारतातल्या विविध ठिकाणी हिंदुस्थानी संगीताचा प्रचार करण्यास पाठवले. संपूर्ण भारतात त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली. त्यानुसार पं. विनायकबुवा पटवर्धन यांना पुण्यात पाठवले आणि त्यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. आमचे गुरू पं. विनायकबुवा पटवर्धन यांनी आम्हाला ‘वंदे मातरम’ ची शंभर वर्षांपूर्वीची ही प्रचलित चाल शिकविली आणि हा अनमोल ठेवा आमच्या पिढीकडे सुपूर्त केला. प्रजासत्ताकदिनी जुन्या चालीवर आधारित  ‘वंदे मातरम’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे ही यामागील इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेVande Mataramवंदे मातरमmusicसंगीतRepublic Dayप्रजासत्ताक दिन