शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची यंदा स्वच्छतेची वारी

By admin | Updated: June 18, 2015 23:29 IST

सर्वांनाच आता वारीचे वेध लागले असून, पुणे जिल्हा परिषद यंदा ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी’ हा संदेश घेऊन संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या वारीत आपली

पुणे : सर्वांनाच आता वारीचे वेध लागले असून, पुणे जिल्हा परिषद यंदा ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी’ हा संदेश घेऊन संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या वारीत आपली ‘स्वच्छतेची वारी’ घेऊन जाणार आहे. यात १०० स्वयंसेवक सहभागी होणार असून, ते वारीपूर्व व वारीनंतर मुक्कामी गावात स्वच्छता करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिली.दर वर्षीप्रमाणे या वर्षी ८ जुलै ते २८ जुलैदरम्यान श्री संत ज्ञानेश्वरमहाराज, श्री संत तुकाराममहाराज व श्री संत सोपानदेवमहाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा आहे. यात राज्यभरातून सुमारे ७ ते ८ लाख वारकरी सहभागी होतात. जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, व दौड, बारामती व इंदापूर तालुक्यांतील ३६ गावांत या पालख्यांचा मुक्काम व विसावा होतो. मात्र, वारीच्या मुक्कामानंतर त्या गावाच्या स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. ग्रामस्थांना या अस्वच्छतेला सामोरे जावे लागते. यासाठी यापूर्वी जिल्हा परिषद या गावांना सोयीसुविधेसाठी सुमारे ३५ लाखांचा निधी देते; मात्र यंदा जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. ते आपल्या १०० स्वयंसेवकांची या वाऱ्यांमध्ये स्वच्छतेची वारी काढणार आहेत. यात जिल्हा कक्षातील १० तज्ज्ञ, तालुका स्तरावरील १२ अधिकारी, २२ स्वयंसेवक प्रतिनिधी, पालखीसमवेत राज्यातील ६ तज्ज्ञ, एनएसएसचे ५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही टीम संबंधित ग्रामस्थांसमवेत संपूर्ण गाव स्वच्छ करून घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणार आहे. त्यामुळे मुक्कामी गावे व विसावे वारीनंतर स्वच्छ व सुंदर राहून ग्रामस्थांची या त्रासातून सुटका होणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास जे कोणी इच्छुक असतील, त्यांनी जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ इवभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)सोयीसुविधांसाठी ३५ लाखया वर्षी पालखीमार्गावरील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेमार्फत पालखीदरम्यान करायच्या सोयीसुविधांकरिता मुक्काम गाव रक्कम २ लाख, पालखी विसावा रक्कम ५० हजार तसेच श्री संत सोपानमहाराज पालखी मुक्कामासाठी ७५ हजार व विसाव्यासाठी २५ हजार रुपये, असे ३५ लाख रुपये इतका निधी देणार आहे.