शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘एसएनडीटी’त वाटल्या चुकीच्या प्रश्नपत्रिका

By admin | Updated: March 23, 2017 04:30 IST

एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या माध्यमातून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींना

पुणे : एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या माध्यमातून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींना बुधवारी इंग्रजी विषयाची चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली, तसेच दीड तासानंतर हाताने लिहिलेल्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे विद्यार्थिनींची परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे सकाळी अकरा वाजता परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थिनींना दुपारी ३.३० वाजेपर्यंत पेपर द्यावा लागला. बुधवारी सकाळी अकरा वाजता इंग्रजी विषयाचा पेपर देण्यासाठी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रात बसल्या. सर्व विद्यार्थिनींना इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. मात्र, त्यातील सर्व प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थिनींनी ही बाब पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींच्या प्रश्नपत्रिका जमा करण्यात आल्या. दुपारी १२.३० वाजता सर्व विद्यार्थिनींना हाताने लिहिलेली इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी दुपारी ३.३० वाजेपर्यंत पेपर लिहून दिला. मुंबई येथील परीक्षा विभागाकडून चुकीची प्रश्नपत्रिका आल्यामुळे हा गोंधळ झाला, असे दूरशिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.