जेजुरी पालिका कर्मचाऱ्यांकडून लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:13+5:302021-09-02T04:23:13+5:30

सोमवारी ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरूकडून त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या ...

Writing off agitation by jury employees | जेजुरी पालिका कर्मचाऱ्यांकडून लेखणी बंद आंदोलन

जेजुरी पालिका कर्मचाऱ्यांकडून लेखणी बंद आंदोलन

सोमवारी ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरूकडून त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या हाताची बोटे कापली गेली व त्यांच्या डोक्यालाही जखम झाली आहे. एका महिला अधिकाऱ्यावर झालेला भ्याड हल्ला संतापजनक असून, या हल्ल्याचा जेजुरी नगरपालिका पालिका अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने निषेध करून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली. तसेच काम बंद आंदोलनही करण्यात आले.

या वेळी संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र गाढवे, बाळासाहेब खोमणे, बाळासाहेब बगाडे, राजेंद्र दोडके, प्रसाद जगताप, अमर रणवरे, सुनील दोडके, बाळासाहेब दोडके, वंदना चिव्हे तसेच पालिकेतील आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता व अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

३१ जेजुरी

जेजुरी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील सहा. आयुक्त यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला.

310821\img_20210831_155557.jpg

?????? ?????? ????????????? ??? ??? ?????? ???? ???? ?????

Web Title: Writing off agitation by jury employees