शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

World BIodiversity Day : ' लॉकडाऊन' ठरतोय फायदेशीर ; तळजाई पाचगाव वनक्षेत्रात मोर, पक्ष्यांचा मुक्तसंचार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 11:48 IST

लॉकडाऊनमुळे मिळाला निवांतपणा; नागरिकांची नाही वर्दळ

ठळक मुद्देशहरात वनस्पती, प्राणी, पक्षी, सरीसृप, कीटक, सूक्ष्मजीव इत्यादींची विविधतावेताळ टेकडी, चतृ:श्रृंगी टेकडी,वाघजाई, हनुमान टेकडी,रामटेकडी, इ. टेकड्या हिरवाईने नटलेल्यापुणे येथील गणेश खिंड उद्यान जीविधता वारसास्थळ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव

श्रीकिशन काळे -

पुणे : पुणे शहर जीविधतेने (बायोडायव्हर्सिटी) नटलेले असून, येथे अनेक ठिकाणे याने संपन्न आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये सर्वच ठिकाणी चांगला परिणाम झाला असणार आहे. कारण तळजाई पाचगाव येथील वनक्षेत्रात तर पशू-पक्षी मुक्तसंचार करताना दिसून येत आहेत. एरव्ही रस्त्यावर न दिसणारे मोर देखील दिसत आहेत. विविध प्रकारचे पक्षी आढळत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात या लॉकडाऊनमुळे पाचगाव येथील या पशू-पक्ष्यांना चांगला दिलासा दिला आहे.पुणे शहराला जीविधतेचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. जमिनीवरील परिसंस्था आणि जलीय परिसंस्था अशो दोन परिसंस्था येथे आहेत. शहरात वनस्पती, प्राणी, पक्षी, सरीसृप, कीटक, सूक्ष्मजीव इत्यादींची विविधता आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय, विधी महाविद्यालय, भांडारकर संशोधन संस्था, बीएमसीसी महाविद्यालय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी यासारख्या शैक्षणिक संस्थांसोबतच बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, एम्प्रेस गार्डन, आघारकर संशोधन संस्था इत्यादी ठिकाणे जीविधतेने नटलेली आहेत. तसेच वेताळ टेकडी, चतृ:श्रृंगी टेकडी,  वाघजाई, हनुमान टेकडी, पर्वती, रामटेकडी, बाणेर-पाषाण टेकडी इत्यादी टेकड्या हिरवाईने नटलेल्या आहेत. त्यात खूप जीविधता आहे.

जलीय परिसंस्थेत विविध प्रकारचे अधिवास दिसतात. शहरात मुळा नदी, मुठा नदी, राम नदी, आंबिल ओढा, भैरोबा नाला, नागझरी नाला, पाषाण तलाव, कात्रज तलाव आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी तळी निर्माण होतात. त्यातही जीविधता असते.  ........................................

शहरातील जीविधतावृक्षांची एकूण संख्या : ४१ लाख ९४ हजार ६२३वृक्षांच्या एकूण प्रजाती : ४१८सर्वाधिक संख्येची प्रजाती : गिरीपुष्पसर्वात मोठे खोड असलेला वृक्ष : वड (१२०२ से. मी.)दुर्मीळ वृक्षांची संख्या : १११

.................................

....

जीविधतेचा ऱ्हासाची कारणे* नैसर्गिक क्षेत्रांचे औद्योगिक आणि निवासी क्षेत्रांत रूपांतर* हानिकारक रासायनिक द्रव्ये वातावरणात मिसळल्याने जैविक विविधतेवर परिणाम* प्राणी, पक्षी आणि औषधी वनस्पतींचा वारेमाप वापर* बदललेली प्रवाह व्यवस्था आणि भक्ष-भक्षक संबंध* जास्त काळ पेटवलेला वणवा काही प्रजाती नष्ट करतो* विदेशी प्रजातींचे आक्रमण झाल्याने देशी प्रजाती होतेय कमी* वातावरणातील बदल झपाट्याने होतात. त्याचा या निसर्गावर परिणाम होतो आणि अनेक प्रजाती नष्ट होतात.

..................................................शहरातील दुर्मीळ आणि जुने वृक्ष जतन करण्याच्या हेतूने शहरातील विविध ठिकाणच्या वृक्षांवर हरितफलक लावले आहेत. नदीपात्रातील वाळुंज या दुर्मीळ वृक्षावर आणि अभिनव चौकातील गोरखचिंच येथेही लावला आहे.जैविक विविधतेचे संवर्धन हे जैविक वारसा क्षेत्रे स्थापन करून देखील करता येते आणि याकरीता पुणे येथील गणेश खिंड उद्यान जीविधता वारसास्थळ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याचे क्षेत्र ३३.०१ हेक्टर असून, यामध्ये महत्त्वपूर्ण नैसर्गिक लागवड केलेली जीविधता आहे. सुमारे १६५ रानटी वनस्पतींच्या जाती, ४९ पिकांच्या जाती, ४५३९ वृक्ष, २३ फळझाडे, ५७ बुरशींच्या जाती, २२ प्रकारचे सूक्ष्मजीव, ६ सस्तन प्राणी प्रजाती, १३ प्रकारच्या सरीसृप, ९५ पक्ष्यांच्या जाती, ७३ प्रकारच्या कीटक प्रजाती, बेडकांच्या ४ प्रजाती व कासवाचे अस्तित्व हे खरोखरच पुणे शहराच्या जीविधतेचे समर्थन करते.

तळजाई पाचगाव येथील जीविधताविविध प्रकारच्या वनस्पती : ४०९विविध प्रकारचे पक्षी : १३५कोळी, विंचू : ९३सस्तन प्राणी : २४वन्यप्रजाती : ८०६

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणforest departmentवनविभागCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस