शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिन : व्यसनांच्या नशेत धुंद तरुणाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 2:04 PM

पुण्यात अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये मोठी वाढ होऊ लागली असून या व्यसनांच्या विळख्यामध्ये तरुणाई जखडली जात आहे.

ठळक मुद्देअंमली पदार्थांची सहज उपलब्धता घरातील १५ ते २६ वयोगटातील मुलांमध्येही वाढत चालले असून गांजाचा वापर सर्वाधिक हुक्क्यामध्ये विविध स्वरुपाचे फ्लेवर मिसळले जात असून त्यातून तंबाखू आणि ड्रग्जचे मिश्रण मेफेड्रोन ही सध्या तस्करांसाठी चलनी नोटशहरातील काही नामवंत आणि उच्चभ्रु महाविद्यालयांमध्ये ड्रग विक्रेत्यांनी जाळे निर्माणएमडीच्या सेवनाने लैंगिक क्षमता वाढत असल्याच्या अपप्रचारामुळेही त्याची मागणी वाढलीशाळकरी मुलांमध्ये व्हाईटनर, व्हेंसेडील, पॉलिश लिक्विडच्या सेवनाचे प्रमाणात झपाट्याने वाढ

पुणे : एरवी झोपडपट्टीतील मुलांमध्ये आढळून येणाऱ्या गांजा, चरस अशा अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण आर्थिकदृष्ट्या संपन्न घरातील १५ ते २६ वयोगटातील मुलांमध्येही वाढत चालले असून गांजाचा वापर सर्वाधिक होत असल्याचे चित्र आहे. यासोबतच स्टॅम्प आणि ई-सिगारेटचे व्यसन करण्याकडे अधिक कल असल्याचा निष्कर्ष व्यसनमुक्ती केंद्र चालविणाऱ्या संस्थांकडून काढला गेला आहे. मुंबईपाठोपाठ पुणेही आता कॉस्मोपॉलिटन शहर बनले आहे. पुण्यात अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये मोठी वाढ होऊ लागली असून या व्यसनांच्या विळख्यामध्ये तरुणाई जखडली जात आहे.

विशेषत: शहरातील विविध भागात छुप्या आणि उघड पद्धतीने सुरु असलेल्या हुक्का पार्लर्समध्ये नशेचे साहित्य राजरोसपणे विकले जात आहे. हे हुक्का पार्लर्स पालकांची डोकेदुखी ठरत आहेत. हुक्क्यामध्ये विविध स्वरुपाचे फ्लेवर मिसळले जात असून त्यातून तंबाखू आणि ड्रग्जचे मिश्रण दिले जात आहे. त्यामध्ये कोकेन आणि एमडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. मोसंबी, संत्रा, आंबा, व्हॅनिला अशी दोन-चार नव्हे तर तब्बल ५२ फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत. प्रिमियम फ्लेवर्सचे ११, तर इकोनॉमी फ्लेवर्सचे तब्बल ४१ फ्लेवर्स बाजारात सध्या उपलब्ध आहेत. प्रमियम फ्लेवर्समध्ये ब्लूबेरी, बॉम्बे पानमसाला, डबल अ?ॅप्पल, सिल्व्हर फॉक्स, स्ट्रॉबेरी असे विविध स्वाद आहेत. तर इकोनॉमी फ्लेवर्समध्ये चॉकलेट, चोको मिन्ट, नारळ, कॉफी, बबलगम, केळे, कोला अशा ४१ फ्लेवर्सचा यात समावेश आहे.यासोबतच मेफेड्रोन ही सध्या तस्करांसाठी चलनी नोट ठरत आहे. एमडीच्या सेवनाची एकदा सवय जडली की ती सहसा सुटत नाही. एमडीच्या सेवनाने लैंगिक क्षमता वाढत असल्याच्या अपप्रचारामुळेही त्याची मागणी वाढली आहे.सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये नायजेरीयन तरुण सर्वाधिक सक्रीय आहेत. दक्षिण आफ्रिका, युरोप आणि आशिया या ह्यगोल्डन कॉरीडोरह्ण मधून कोकेन, ब्राऊन शुगर सारख्या महागड्या नशेच्या साहित्याची तस्करी केली जात आहे. शहरातील काही नामवंत आणि उच्चभ्रु महाविद्यालयांमध्ये ड्रग विक्रेत्यांनी जाळे निर्माण केले आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा, कोंढवा, वानवडी, लष्कर, येरवडा, विमाननगर, बाणेर, हिंजवडी, पाषाण आदी परिसरात अधिक मागणी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. =====रेव्ह पार्टी, हुक्का व मद्य पार्ट्या आयोजित केल्या जातात. सोशल नेटवर्किंग साईट्सवर आणि व्हॉट्स अ‍ॅपवर अ‍ॅक्टीव्ह असलेल्या तरुणाईपर्यंत ही व्यसनाची साधने पोचवणे सोपे झाले आहे. त्यातच शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेल्या तरुणांकडे त्यांच्या पालकांचे लक्ष नसते. आपली मुले कुठे जातात, काय करतात याकडे पहायला पालकांना वेळ नाही. त्यामुळे असे सावज हे डीलर्स शोधत असतात. अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये सर्वाधिक प्रमाण महाविद्यालयीन तरुणांचेच आहे.====शाळकरी मुलांमध्ये व्हाईटनर, व्हेंसेडील, पॉलिश लिक्विडच्या सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. त्यांचे कौमार्य आणि तारुण्य या व्यसनांमुळे कुस्करले जात आहे.
यासोबतच स्टिकर नावाचा एक अमली पदार्थ मिळतो. हा पदार्थ जिभेवर ठेवला ही त्याची नशा होते. नायट्रेक्स टॅब्लेट्सही बाजारात उपलब्ध आहेत.====इंटरनेट  अ‍ॅडिक्शन, तासनतास मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावर अ‍ॅक्टीव्ह असणे, सतत पॉर्न साईट्स अथवा पॉर्न क्लिप पाहात राहणे हा सुद्धा मानसिक आजाराचा एक ट्रेंड समोर येऊ लागला आहे. ई-सिगारेटचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या दोन वर्षात गांजा सेवनाचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गांजा सहज उपलब्ध होत आहे. हुक्का आणि त्यामधून नशा याचे प्रमाणही वाढत चालले आहे. योग्य माहिती, समुपदेशन आणि जनजागृती यातून वाढत्या व्यसनाधिनतेवर अंकुश मिळवता येऊ शकेल.

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस