राजमाता जिजाऊंचे कार्य प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:09 IST2021-01-14T04:09:38+5:302021-01-14T04:09:38+5:30

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे श्री पांडुरंग विद्यामंदिरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ...

The work of Rajmata Jijau is inspiring | राजमाता जिजाऊंचे कार्य प्रेरणादायी

राजमाता जिजाऊंचे कार्य प्रेरणादायी

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे श्री पांडुरंग विद्यामंदिरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना थोरात बोलत होते.

यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सुरेश थोरात यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब वाघ,संगीता गवारी,योगीता हरगुडे,महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष प्रवीणकुमार जगताप,प्रभाकर चांदगुडे,अरुण शिंदे,विशाल कुंभार,प्रकाश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी इयत्ता पाचवीतील अक्षरा गवारी,श्रेया ढमढेरे,सानवी लोखंडे,तनिष्का भैरवकर,तनुष्का गवारी,भावेश कातोरे, यांनी मनोगत व्यक्त केले इयत्ता आठवीतील अनुजा सांगळे हिने राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर कविता सादर केली.तर बाळासाहेब गायकवाड यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर माहिती सांगितली.

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करताना इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी)

Web Title: The work of Rajmata Jijau is inspiring