शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

पक्ष्यांच्या अद्भुत दुनियेची सफर; पुण्यातील भारती निवास सोसायटीचा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:04 PM

पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्याकडून पक्ष्यांच्या गमतीजमती ऐकणे ही मुलांसाठी आनंदाची पर्वणी ठरली. निमित्त होते भारती निवास सोसायटीच्या ३१ व्या वर्षाच्या प्रारंभी आयोजित केलेल्या किका कार्यक्रमाचे.

ठळक मुद्देपुरंदरे काढू शकतात ७० भारतीय पक्ष्यांचे आवाज, त्यांच्याकडे आहेत ५०००हून अधिक स्लाइड्सकाकाकुवा ११० वर्षे, घुबड ६८, गिधाड ५२, मोर २० तर चिमणी जगते ८ वर्षे

पुणे : पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्याकडून पक्ष्यांच्या गमतीजमती ऐकणे ही मुलांसाठी आनंदाची पर्वणी ठरली. निमित्त होते भारती निवास सोसायटीच्या ३१ व्या वर्षाच्या प्रारंभी आयोजित केलेल्या किका कार्यक्रमाचे.  किरण पुरंदरे हे ७० भारतीय पक्ष्यांचे आवाज काढू शकतात आणि त्यांच्याकडे त्यांच्या ५००० हून अधिक स्लाइड्स आहेत, असे संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सुरुवातीलाच सांगितले. त्यामुळे उपस्थितांना त्यांच्या अभ्यासाची कल्पना आली. पुरंदरे म्हणाले, पुणे शहर आणि परिसरात सुमारे ३५० पक्षी दिसतात. महाराष्ट्रात ५६०, भारतात १३०० जातींचे तर जगात १०,००० जातींचे पक्षी दिसतात. काही पक्ष्यांना उडता येते तर काहींना येत नाही. पक्षी जेवढा आकाराने मोठा तेवढा तो जास्त जगतो. लहान पक्षी कमी जगतो. काकाकुवा ११० वर्षे, घुबड ६८, गिधाड ५२, मोर २० तर चिमणी ८ वर्षे जगते.'यलो फुटेड ग्रीन पिजन'हा महाराष्ट्राचा पक्षी असून तो अंजिरासारखी फळे खातो. ज्या पक्ष्याच्या पायाचे मधले बोट मोठे असते, तो जोरात पळू शकतो. सगळे पक्षी रोज अंघोळ करतात, असे  पुरंदरे यांनी आवर्जून मुलांना सांगितले. पाऊस जवळ आला की पावश्या 'पेरते व्हा' असा संदेश देतो. गरुड विषारी साप मारून खातो आणि ते विष पचवूही शकतो. निशाचर पक्ष्यांचे डोळे मोठे असतात. अशा रंजक गोष्टी त्यांनी मुलांना सांगितल्या. त्यानंतर त्यांनी विविध पक्ष्यांचे आवाज काढले. त्यांची जुगलबंदीही ऐकवली. त्यात मुलांबरोबर मोठेही गुंगून गेले. प्रज्ञा गोवईकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दाऊद सुतार यांनी पारदर्शिका दाखविल्या. माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. या वेळी अनघा पुरंदरे उपस्थित होत्या.

टॅग्स :Puneपुणे