चिंचोलीत दुचाकीस्वार चोरटयांनी महिलेचे सात तोळयांचे दागिने लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 13:29 IST2018-05-07T13:29:20+5:302018-05-07T13:29:20+5:30

चिंचोली येथील पाहुण्यांकडे पायी चाललेल्या एका महिलेच्या गळयातील सात तोळयांचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावत पोबारा केला.

women jewellery theft by two wheeler persons in Chincholi | चिंचोलीत दुचाकीस्वार चोरटयांनी महिलेचे सात तोळयांचे दागिने लुबाडले

चिंचोलीत दुचाकीस्वार चोरटयांनी महिलेचे सात तोळयांचे दागिने लुबाडले

ठळक मुद्देयाप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

देहूरोड : चिंचोली येथील पाहुण्यांकडे पायी चाललेल्या एका महिलेच्या गळयातील सात तोळयांचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावत पोबारा केला. ही घटना रविवारी (दि . 6) घडली.
मिनाक्षी अमित घोलप ( वय ३० ,रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
देहूरोड पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, मिनाक्षी ह्या चिंचोली (देहूरोड) येथील पाहुण्यांना भेटण्यास रविवारी दुपारच्या सुमारास जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोन चोरटयांनी त्यांच्या गळयातील सात तोळयांचे सोन्याचे दागिने (सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज) हिसकावून पोबारा केला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार करत आहेत. 

Web Title: women jewellery theft by two wheeler persons in Chincholi