शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

महिलेला चक्क स्कूटर मिळाली बदलून; ग्राहकाने मिळविला हक्क 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 7:58 PM

ग्राहक पंचायतीकडे जाताच मिळाली नवीन दुचाकी

- विशाल शिर्केपिंपरी : साधी डाळ खराब निघाली तरी दुकानदार ती बदलून देताना खळखळ करतो. मग, एखादी स्कूटरच खराब निघाली तर? ग्राहक पंचायतीच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या लढ्यामुळे अवघ्या चार ते पाच महिन्यांत महिलेला चक्क नादुरुस्त स्कूटरच्या बदल्यात नवी कोरी स्कूटर मिळाली. इतकेच नाही तर, घेतलेल्या स्कूटरच्या पुढील श्रेणीतील वाहन कोणताही नवा पैसा न भरता मिळाले.

औंधमधील डीपी रस्त्याजवळ राहणाऱ्या सुरेखा तापडिया यांनी चिकाटीने लढा देत आपला हक्क मिळविला. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगर अध्यक्ष विजय सागर म्हणाले, एखाद्या कंपनीने दिलेले उत्पादन खराब निघाल्यास ते बदलून घेण्याचा ग्राहकांना हक्क आहे. केवळ कॉलसेंटरला कळवून उपयोगाचे नाही. कंपनीशी लेखी अथवा ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करावा. रजिस्टर पत्राची एक प्रत आपल्याकडे ठेवावी. तसेच, पत्रव्यवहार करताना संबंधित अडचण ठराविक मुदतीत मार्गी काढण्याची मागणी करावी. तरच, त्याला काहीसा अर्थ राहील.

------------

डेक्कन येथील एका वितरकाकडून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली. तीन महिने चालल्यानंतर गाडी वारंवार बिघडू लागली. काही वेळा दुरुस्ती केली. मात्र, वारंवार बॅटरीचा त्रास सुरू झाला. शेवटी संबंधित कंपनीला फोन केला. मात्र, त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. आपण फसविले गेल्याची भावना निर्माण झाली. एका परिचिताने ग्राहक पंचायतीकडे तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार ग्राहक पंचायतीकडे तक्रार केली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कंपनीकडे पत्रव्यवहार केला. कंपनी व्यवस्थापन, संबंधित वितरकाशी बोलणी केल्यानंतर चार ते पाच महिन्यांत कंपनीने त्यांची पुढील श्रेणीतील स्कूटर बदलून दिली.

- सुरेखा तापडिया, ग्राहक

---

वाहन खरेदी आणि देखभाल दुरुस्ती करताना घ्या काळजीवाहन खरेदी करताना त्यातील बॅटरीची गॅरंटी-वॉरंटी (वस्तूचा हमी कालावधी), वाहनाची गॅरंटी आणि वॉरंटी पाहावी. बॅटरी आणि वाहन उत्पादनाची तारीख पाहावी. देखभाल दुरुस्तीला वाहन सोडल्यानंतर चांगली बॅटरी काढून घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती केल्यानंतर त्यावर बॅटरीचा क्रमांक नोंदविला की नाही, ते पाहावे. तसेच महत्त्वाचे सुटे भाग बदलले नसल्याची खात्री करावी, असे विजय सागर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरWomenमहिला