पुण्यातील केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन महिलेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 13:43 IST2020-06-22T13:39:05+5:302020-06-22T13:43:07+5:30
शहरातील आत्महत्येचे सत्र संपेना

पुण्यातील केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन महिलेची आत्महत्या
पुणे : शहरातील आत्महत्येचे सत्र संपण्याचे नाव घेण्यास तयार नाही. रास्ता पेठेतील केईएम हॉस्पिटलमधील डायमंड ज्युबली इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पहाटे उडी मारुन एका महिलेने आत्महत्या केली.
यासना मुकेश बकसानी (वय ३६, रा. वानवडी) असे या महिलेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी या महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात कोणावरही तक्रार नसल्याचे लिहिले आहे.
याबाबतची माहिती अशी, यासना हिचे पती मुकेश बकसानी यांचे ३ महिन्यांपूर्वी कॅन्सरच्या आजाराने निधन झाले होते. त्यांचा १३ वर्षाच्या मुलगा गर्व बकसानी हा गेली ४ वर्षे किडनी व डायबिटीजच्या आजाराने त्रस्त असून त्याला उपचारासाठी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पाचव्या मजल्यावरील ग्रील नसलेल्या खिडकीतून यासना यांनी उडी घेऊन आत्महत्या केली़ समर्थ पोलीस अधिक तपास करीत आहेत.