शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

मुलाचा सांभाळ करण्याचे वचन देऊन महिलेवर बलात्कार, गर्भवती राहिल्यावर दिली मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 10:29 IST

याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद...

पुणे : मुलाचा वडिलांप्रमाणे सांभाळ करेन, असे वचन देऊन महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तुझा गर्भ पाडून टाक, असे सांगून लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुधीर अर्जुन बंकपल्ली (वय ३५, रा. अॅमेनोरा पार्क, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. हा प्रकार २०१९ पासून ५ जानेवारी २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे अॅमेनोरा पार्क या सोसायटीत राहतात. सुधीर बंकपल्ली याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या मुलाचा वडिलांप्रमाणे सांभाळ करेन, असे वचन देऊन तिचा विश्वास संपादन केला. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन दाखल तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले.

यातून फिर्यादी गर्भवती राहिल्या. याची माहिती तिने सुधीर व त्याच्या आई वडिलांना दिली. तेव्हा त्यांनी फिर्यादीला तू तुझा गर्भ पाडून टाक. तो तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तू जर तसे केले नाहीस तर तुला व तुझ्या मुलाला आम्ही जीवे मारुन टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरून शेवटी पोलिसांकडे धाव घेतली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीHadapsarहडपसरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMolestationविनयभंग