मुलाचा सांभाळ करण्याचे वचन देऊन महिलेवर बलात्कार, गर्भवती राहिल्यावर दिली मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 10:29 IST2022-02-22T10:28:28+5:302022-02-22T10:29:34+5:30
याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद...

मुलाचा सांभाळ करण्याचे वचन देऊन महिलेवर बलात्कार, गर्भवती राहिल्यावर दिली मारण्याची धमकी
पुणे : मुलाचा वडिलांप्रमाणे सांभाळ करेन, असे वचन देऊन महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तुझा गर्भ पाडून टाक, असे सांगून लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुधीर अर्जुन बंकपल्ली (वय ३५, रा. अॅमेनोरा पार्क, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. हा प्रकार २०१९ पासून ५ जानेवारी २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे अॅमेनोरा पार्क या सोसायटीत राहतात. सुधीर बंकपल्ली याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या मुलाचा वडिलांप्रमाणे सांभाळ करेन, असे वचन देऊन तिचा विश्वास संपादन केला. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन दाखल तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले.
यातून फिर्यादी गर्भवती राहिल्या. याची माहिती तिने सुधीर व त्याच्या आई वडिलांना दिली. तेव्हा त्यांनी फिर्यादीला तू तुझा गर्भ पाडून टाक. तो तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तू जर तसे केले नाहीस तर तुला व तुझ्या मुलाला आम्ही जीवे मारुन टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरून शेवटी पोलिसांकडे धाव घेतली.