धक्कादायक! कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून विवाहित महिलेवर केला बलात्कार; बदनामीची धमकी देत वारंवार अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 05:30 PM2022-01-08T17:30:28+5:302022-01-08T18:56:48+5:30

आरोपीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून फिर्यादीचे फोटो काढले....

woman raped drinking alcohol in cold drinks pune crime news | धक्कादायक! कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून विवाहित महिलेवर केला बलात्कार; बदनामीची धमकी देत वारंवार अत्याचार

धक्कादायक! कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून विवाहित महिलेवर केला बलात्कार; बदनामीची धमकी देत वारंवार अत्याचार

Next

पिंपरी : कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून महिलेचे फोटो काढले. ते फोटो तिच्या पती व नातेवाईकांना पाठवून बदनामीची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे व चाकण येथे २० एप्रिल २०१९ ते २० ऑगस्ट २०२१ या कालावधीत ही घटना घडली. संदीप बुरुटे (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित महिलेने या प्रकरणी शुक्रवारी (दि. ७) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून फिर्यादीचे फोटो काढले. ते फोटो फिर्यादीचे आई-वडील नातेवाईक तसेच पती यांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध फिर्यादी सोबत वारंवार लैंगिक संबंध केले. 

तळेगाव दाभाडे तसेच चाकण येथे वेगवेगळ्या हॉटेल व लॉजवर आरोपीने फिर्यादीला घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. बलात्कार प्रकरणी आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: woman raped drinking alcohol in cold drinks pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.