बारामती तालुक्यातील सुपा परिसरात महिलेची हत्या, निर्वस्त्र मृतदेह दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:56 IST2026-01-19T20:55:16+5:302026-01-19T20:56:35+5:30

माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत अंदाजे २५ ते २७ वयोगटातील महिलेवर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून अज्ञात शस्त्राने अमानुष हल्ला करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह रस्त्यालगत टाकून देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले.

Woman murdered in Supa area of Baramati taluka, naked body found, creating a stir in the area | बारामती तालुक्यातील सुपा परिसरात महिलेची हत्या, निर्वस्त्र मृतदेह दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ

बारामती तालुक्यातील सुपा परिसरात महिलेची हत्या, निर्वस्त्र मृतदेह दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ

बारामती तालुक्यातील सुपा परिसरात एका तरुण महिलेचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह रस्त्यालगत टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बारामती तालुक्यातील सुपे गावाजवळील काळखैरेवाडी हद्दीतील खैरेपडळ परिसरात आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. रस्त्याच्या कडेला एक निर्वस्त्र मृतदेह दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत अंदाजे २५ ते २७ वयोगटातील महिलेवर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून अज्ञात शस्त्राने अमानुष हल्ला करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह रस्त्यालगत टाकून देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले.

या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, फॉरेन्सिक तज्ज्ञ व श्वानपथकाला तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथके तैनात करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक साधनांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात येत आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title : बारामती के सुपा में महिला की हत्या; निर्वस्त्र शव बरामद

Web Summary : बारामती के सुपा के पास एक युवती की निर्मम हत्या कर शव फेंक दिया गया। पुलिस ने निर्वस्त्र शव मिलने के बाद जांच शुरू कर दी है। सीसीटीवी और फोरेंसिक सबूतों का उपयोग करते हुए पुलिस की पांच टीमें अपराधी की तलाश कर रही हैं।

Web Title : Woman Murdered in Supa, Baramati; Naked Body Found

Web Summary : A young woman was brutally murdered and her body dumped near Supa, Baramati. Police are investigating the crime after finding the naked body. Five police teams are searching for the culprit, using CCTV and forensic evidence.