बिर्याणी चांगली झाली पाहिजे म्हणत केला महिलेचा विनयभंग! मार्केट यार्ड परिसरातील हॉटेलमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 12:10 IST2024-01-18T12:06:39+5:302024-01-18T12:10:01+5:30

याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे...

Woman molested saying biryani should be good! Types of hotels in Market Yard area | बिर्याणी चांगली झाली पाहिजे म्हणत केला महिलेचा विनयभंग! मार्केट यार्ड परिसरातील हॉटेलमधील प्रकार

बिर्याणी चांगली झाली पाहिजे म्हणत केला महिलेचा विनयभंग! मार्केट यार्ड परिसरातील हॉटेलमधील प्रकार

पुणे : हॉटेलच्या किचनमध्ये घुसून महिलेसोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याची घटना मार्केट यार्ड परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी बाराच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. यावरून लक्ष्मण अमृत घाडगे (४०) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे मार्केट यार्ड येथे हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी लक्ष्मण घाडगे हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी आला होता. त्याने फिर्यादी यांच्या पतीकडे बिर्याणीची मागणी केली असता त्यांनी अर्धा तास लागेल असे सांगितले. यानंतर फिर्यादी यांचे पती कन्स्ट्रक्शन साइटवर गेले. दरम्यान, फिर्यादी हॉटेलच्या किचनमध्ये बिर्याणी तयार करत होत्या. त्यावेळी आरोपी किचनमध्ये आला. त्याने फिर्यादी यांच्या गालावर हात फिरवून गैरवर्तन केले. तसेच, बिर्याणी चांगली झाली पाहिजे, नाही तर तुला किडनॅप करेन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत ॉम्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.

Web Title: Woman molested saying biryani should be good! Types of hotels in Market Yard area