डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा ‘तुम .... करोगी’ म्हणत विनयभंग; पुण्यातील घटना

By नितीश गोवंडे | Updated: September 6, 2023 17:27 IST2023-09-06T17:24:18+5:302023-09-06T17:27:52+5:30

याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Woman molested by delivery boy saying 'You .... Karogi'; Incident in Pune | डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा ‘तुम .... करोगी’ म्हणत विनयभंग; पुण्यातील घटना

डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा ‘तुम .... करोगी’ म्हणत विनयभंग; पुण्यातील घटना

पुणे : सॅनिटरी पॅडची डिलिव्हरी घेऊन आलेल्या एका डिलिव्हरी बॉयने हा २६ वर्षीय महिलेला ‘तुम सेक्स करोगी?’ असे विचारत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने स्विगी वरून त्यांच्या घरगुती सामानाची ऑर्डर केली होती. आलेले सामान तपास असताना, त्यांना सॅनिटरी पॅडचे पॅकिंग फोडलेले दिसल्याने त्यांनी संबंधित कंपनीला फाटलेल्या सॅनिटरी पॅडचा फोटो पाठवला. कंपनीने सॅनिटरी पॅड घेऊन नवीन डिलिव्हरी बॉयला त्यांच्या पत्त्यावर पाठवले. त्यावेळी डिलिव्हरी बॉयने संबंधित महिलेला नवीन सॅनिटरी पॅडचे पाकीट देत पेमेंटविषयी विचारणा केली. तेव्हा महिलेने संबंधित कंपनीशी बोलून घ्या असे सांगितले. यावर त्या डिलिव्हरी बॉयने मोबाइल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्याशी अश्लील हावभाव करत ‘तुम सेक्स करोगी?’ असे म्हणत विनयभंग केला.

याप्रकरणी संबंधित कंपनीच्या टोल क्रमांकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्या डिलिव्हरी बॉयचा शोध घेत आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बेंदगुडे करत आहेत.

Web Title: Woman molested by delivery boy saying 'You .... Karogi'; Incident in Pune