Leopard Attack : लांडेवाडी चिंचोली येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 20:19 IST2025-06-03T20:18:11+5:302025-06-03T20:19:10+5:30

- वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Woman injured in leopard attack in Landewadi Chincholi | Leopard Attack : लांडेवाडी चिंचोली येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

Leopard Attack : लांडेवाडी चिंचोली येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

मंचर : लांडेवाडी / चिंचोडी ता. आंबेगाव येथे आज दुपारी चारच्या सुमारास शेतात खुरपणी करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.

आज दि. तीन जून रोजी दुपारी चारच्या लांडेवाडी चिंचोली येथील बोंबले वस्ती येथे शेतात खुरपणीचे काम करत असणाऱ्या कमल प्रकाश बोंबले (वय ४०) यांच्यावर खुरपणी करताना बाजूच्या उसाच्या शेतातून बिबट्याने अचानक येऊन त्यांच्यावर हल्ला केला मात्र त्यांनी सावध होऊन हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला या घटनेत त्यांच्या हातावर बिबट्याचे दोन दात लागल्याने त्या जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच मंचर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी तात्काळ वनरक्षक शिवाजी ढोले, वनरक्षक पी, एम. कांबळे यांना घटनास्थळी पाठवले कमल बोंबले यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे विकास भोसले यांनी सांगितले.

Web Title: Woman injured in leopard attack in Landewadi Chincholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.