Pune: कोल्ह्याने केलेल्या हल्ल्यात महिला जखमी, जुन्नर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 20:21 IST2023-12-14T20:21:01+5:302023-12-14T20:21:44+5:30
कोल्ह्याने अचानक केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी...

Pune: कोल्ह्याने केलेल्या हल्ल्यात महिला जखमी, जुन्नर तालुक्यातील घटना
बेल्हा (पुणे) : बांगरवाडी (ता. जुन्नर) येथे शेती कामासाठी शेतात जात असताना दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने अचानक केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. १४) सकाळच्या सुमारास घडली.
जखमी महिलेला बेल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. बांगरवाडी येथील सुमन ज्ञानेश्वर ठुबे (वय ४८) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुमन या महिला शेती कामासाठी मळ्यात जात असताना रस्त्याच्या कडेला गवतात दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बेल्हा वनमंडल वनपाल नीलम ढोबळे व वनमजूर जे.टी. भंडलकर यांनी दिली.