शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
2
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
4
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
5
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
6
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
7
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
8
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
9
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
10
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
11
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
12
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
13
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
14
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
15
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
16
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
17
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
18
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
19
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली आल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:09 IST

पुणे : महमंदवाडी येथे महिला ट्रॅॅक्टरवरून खाली पडल्यानंतर चढावरून ट्रक्टर अचानक मागे आल्याने चाकाखाली आलेल्या महिलेचा मृत्यू झाला. नंदा ...

पुणे : महमंदवाडी येथे महिला ट्रॅॅक्टरवरून खाली पडल्यानंतर चढावरून ट्रक्टर अचानक मागे आल्याने चाकाखाली आलेल्या महिलेचा मृत्यू झाला.

नंदा अशोक यादव (वय ४४, रा. राजीव गांधी कॉलनी, तरवडे वस्ती, महमंदवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. टॅक्टरचालक महावीर अर्जुन पटेकर (रा. कवडेपाठ, कदमवाक वस्ती, लोणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदा यादव या गृहिणी होत्या. तर त्यांचे पती माळी काम करतात. त्यांचे महमंदवाडी पोलिस चौकीच्या मागे तरवडेवस्ती येथे घर आहे. त्यांनी घरात कोबा करण्याचे काम काढले होते. या कामासाठी आवश्यक असणारे साहित्य घेऊन त्या मंगळवारी दुपारी त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून घरी चालल्या होत्या. परंतु, त्यांच्या घराच्या अलीकडे महमंदवाडी चौकीच्या मागे तरवडे वस्तीवर जाण्यासाठी मोठा चढ आहे. टॅक्टर चढावर चढत असताना नंदा यादव अचानक खाली पडल्या. ही घटना चालक महावीर पटेकर याला समजल्यानंतर त्याने ट्रॅक्टरवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ट्रॅक्टर उतारामुळे खाली आल्यामुळे ट्रॅक्टरचे चाक नंदा यादव यांच्या बरगडीवर गेले. त्यांच्या बरगडीची हाडे तुटली आणि फुफुस्साला गंभीर जखम झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्यांचा अपघाती मृत्यू झाला. उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे अधिक तपास करत आहेत.