PMPML च्या महिला कंडक्टरला मारहाण, चालकालाही शिवीगाळ; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 11:27 IST2023-11-24T11:27:09+5:302023-11-24T11:27:39+5:30
बोपखेल फाटा ते वडमुखवाडी रस्त्यावर बुधवारी (दि. २२) ही घटना घडली....

PMPML च्या महिला कंडक्टरला मारहाण, चालकालाही शिवीगाळ; गुन्हा दाखल
पिंपरी :पीएमपीएमएल बसच्या महिला वाहकाच्या हातातील मशीन हिसकावून घेत मोबाइलने मारहाण केली. तसेच बसच्या चालकालादेखील धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. बोपखेल फाटा ते वडमुखवाडी रस्त्यावर बुधवारी (दि. २२) ही घटना घडली.
पीएमपीएमएलच्या वाहक महिलेने याप्रकरणी दिघीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून विकास मारुती सातपुते (३०, रा. मोशी) व एक विधिसंघर्षित बालक यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वाहक या पीएमपीएमएल बसमधून मनपा येथून आळंदी येथे जात होत्या. यावेळी विकास सातपुते आणि विधिसंघर्षित बालक हे फिर्यादी महिलेजवळ आले. ते महिलेची मशीन ओढून घेत होते. फिर्यादी महिलेने विरोध केला असता त्यांनी मोबाइलने फिर्यादी महिलेला मारहाण केली. यावेळी त्यांना बसच्या खाली उतरवले असता त्यांनी फिर्यादी महिला व चालकाला शिवीगाळ केली. तसेच बसच्या चालकालाही धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत नमूद आहे.