शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! ४ वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 16:19 IST

दरम्यान महिलेच्या पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

ठळक मुद्देमहिला काही कारणाने तणावात होती

 केंदुर : शिरूर तालुक्याच्या करंदी येथे एका महिलेने आपल्या साडेचार वर्षाच्या मुलासह घरा जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तर या घटनेनंतर महिलेच्या पतीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  मोनिका भगवान चंद्रावळे  (वय ३०) व साई उर्फ ऋषी भगवान चंद्रावळे (वय ४ ) अशी त्यांची नावे असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.            मोनिका चंद्रावळे या काही तणावात होत्या. सकाळच्या सुमारास त्या तिच्या मुलाला घेऊन कोठेतरी गेल्या. त्यांनतर दुपारच्या वेळेस शेजारील काही नागरिक शेतात काम करत असताना त्यांना विहिरीमध्ये मोनिका व ऋषी यांच्या चपला तरंगत असल्याचे आढळून आले.

त्यावेळी दोघा माय - लेकांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविला गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान काही नागरिकांनी लोखंडी गळ व दोरीच्या सहाय्याने विहिरीमधील मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोनिका आणि साई यांचे मृतदेह मिळून आले.

यावेळी मोनिका चा पती भगवान चंद्रावळे यांनी देखील आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. भगवान यांच्यावर पुणे येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून त्यांची परिस्थिती स्थिर आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

टॅग्स :ShirurशिरुरPuneपुणेPoliceपोलिसAccidentअपघातWomenमहिलाWaterपाणी