आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल ; धनकवडीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 17:19 IST2019-08-20T17:17:21+5:302019-08-20T17:19:48+5:30
पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून स्वतःच्या मुलीचा खून करुन पित्याने आत्महत्या केली हाेती. याप्रकरणी त्याच्या पत्नीच्या विराेधात गुन्हा दाखल झाला आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल ; धनकवडीतील धक्कादायक घटना
धनकवडी : पत्नीचे अनैतिक प्रेम संबंध व सारसच्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून पित्याने स्वतः च्या आठ वर्षाच्या मुलीचा खून करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडी परिसरात शनिवारी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर आणि सासू सासरे यांच्या विराेधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
धनकवडी येथे घडलेल्या या घटनेत अशिष जगन्नाथ भोंगाळे वय ४३ वर्षे याने मुलगी श्रद्धा अशिष भोंगाळे वय वर्षे आठ हिचा खून करून स्वतः आत्महत्या केली होती. या प्रकरणी अशिष यांची आई शशिकला भोंगाळे वय ६३ वर्षे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पत्नी शुभांगी अशिष भोंगाळे वय ३५ वर्षे तिचा प्रियकर, आई व वडील यांच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिषला दारू चे व्यसन होते. त्यामुळे आशिष आणि त्याची पत्नी शुंभागी यांच्या मध्ये सतत वाद निर्माण होत होते. त्यामुळे शुंभागी या पतीपासून दूर राहत होत्या. तिच्या प्रेम संबंधामुळे अशिषला मानसिक त्रास झाला होता. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे अधिक तपास करीत आहेत.