सिमेंटच्या गट्टूने महिलेला केली मारहाण, तरुण पोलिसांच्या अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 15:42 IST2021-03-24T15:42:06+5:302021-03-24T15:42:48+5:30
भांडणात मध्यस्थी करताना घडला हा प्रकार

सिमेंटच्या गट्टूने महिलेला केली मारहाण, तरुण पोलिसांच्या अटकेत
पिंपरी: नणंद आणि तिचा पती यांच्यातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला शिवीगाळ करून सिमेंटच्या गट्टूने कपाळावर मारून जखमी केले. तसेच धमकी दिली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. संत तुकाराम नगर पिंपरी येथे सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
समीर शिवाजी गोताड (वय ३८, रा. पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पूजा दिनेश दुर्गावले (वय ४०, रा. नवी मुंबई) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नणंद आणि तिचा पती यांच्यात भांडण सुरू होते. ते भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या. त्यावेळी आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. तसेच सिमेंटच्या गट्टूने कपाळावर मारून फिर्यादीला जखमी करून धमकी दिली.