हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये स्नान करीत असलेल्या महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 13:53 IST2022-06-07T13:51:19+5:302022-06-07T13:53:36+5:30
गणेशखिंड रोडवरील एका हॉस्पिटलमधील घटना...

हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये स्नान करीत असलेल्या महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग
पुणे : खासगी रूमच्या बाथरूममध्ये स्नान करीत असलेल्या महिलेला पाहून तिचा पाठलाग करत विनयभंग करण्याचा प्रकार वाॅर्डबाॅयकडून घडल्याचे पुढे आले आहे. गणेशखिंड रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये शनिवारी ही घटना घडली.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आयाज शेख (वय २५, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, खडकी) या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत बाणेर येथील महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, गणेशखिंड रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये फिर्यादीच्या मुलाचे हाताचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर फिर्यादी खासगी रूममध्ये येत स्नानासाठी बाथरूममध्ये गेल्या होत्या. त्यावेळी आराेपीने शेजारील रूमच्या जाळीतून फिर्यादीला पाहत मनास लज्जा उत्पन्न केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.