शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

Manoj Jarange Patil: फडणवीसांशिवाय सरकारच पान हलत नाही; मुख्यमंत्री कोणीही असो निर्णय तेच घेतात - जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 13:25 IST

विधानसभा निवडणूक लढवण्याची आम्ही रणणिती उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस डाव करतील

पुणे : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षणाबाबत राज्य सरकारबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.  देवेंद्र फडणवीस शिवाय सरकारमधील पानही हलत नाही.‌ मुख्यमंत्री कोणीही असो निर्णय फडणवीसच घेतात. त्यामुळे मी माझ्याकडे आलेल्या ८ ते १० आमदारांना देवेंद्र फडणवीस यांना जाऊन आरक्षण द्यायला सांगा असं म्हटलं होत. ते सागर बंगल्यावर गेले आणि परत आलेच नाहीत. देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर जादू करतात अशी टीका त्यांनी केली आहे. काल भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी ते पुणे जिल्ह्यात आले होते. आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर निशाण साधला.   

जरांगे पाटील म्हणाले, निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. पण निर्णय कोणताही झाला नाही. पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की २८८ पाडायचे. मराठा समाज निवडणुकीत सन्नाट चालणार आहे. आम्ही रणनीती उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस डाव करतील. दहशतीने निवडणूक जिंकता येत नाही तर मायेनं जिंकता येणार असल्याचे पाटील यावेळी म्हणाले आहेत. 

राज्यातील नेते मंडळी आंतरवलीत येऊन फुकट चहा पिऊन जातात. पण मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन. देवेंद्र फडणवीस खुनशी आणि मराठा द्वेषी आहेत. त्यामुळे सगे सोयरेचा निर्णय होत नाही. देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही, पण मराठा द्वेशी आणि वागण्याची पद्धत विचित्र आहे. माझ्यावर खोटा खटला दाखल केला. मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचावा यांसाठी आम्ही नाटक आणलं होतं. त्यात तोटा आला. आम्ही आमच्या परीने पैसे दिले. जबाबदारी वाटून घेतली. पण माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर खोटा खटला दाखल केला असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठवाड्यात पावसामुळे मोठं नुकसान झालंय. पण मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार