शहरातील सोसायट्यांच्या सीमा भिंतीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव देणार : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 15:01 IST2021-01-04T15:01:16+5:302021-01-04T15:01:34+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन देणार

Will submit proposal to state government for boundary wall of societies in the city: Chandrakant Patil | शहरातील सोसायट्यांच्या सीमा भिंतीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव देणार : चंद्रकांत पाटील 

शहरातील सोसायट्यांच्या सीमा भिंतीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव देणार : चंद्रकांत पाटील 

ठळक मुद्देशहरातील विविध योजनांबाबत पालिका आयुक्तांसह विविध अधिकाऱ्यांची घेतली भेट

पुणे : दरवर्षी पाऊस झाला की नाल्यांचे पाणी शहरात घुसते. त्यासाठी भिंती बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी ३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. खासगी सोसायट्यांच्या भिंती पालिकेच्या खर्चातून बांधणे शक्य नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. पालिकेच्या भिंती वगळून सोसायट्यांच्या भिंतींबाबत प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवावा. त्याचा पाठपुरावा केला जाईल. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. नाले सफाई करताना ठेकेदार गाळ काढतात की फक्त पैसे घेतात हे पाहण्यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवावे असेही पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदार संघ आणि शहरातील विविध योजनांबाबत पालिका आयुक्तांसह विविध अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संदीप खर्डेकर, राजेश पांडे आदी उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, नाल्यांचा विषय जून आधी संपवावा, अन्यथा निम्मे पुणे पाण्याखाली जाईल. डीपी रस्त्यांचा विकास अडला आहे. या रस्त्यांवर अतिक्रमणे आहेत. बधितांकडून जागेचा रोख मोबदला मागितला जातो. पालिकेकडून टीडीआर दिला जातो. बॉण्ड देण्याचा विचार असून हे बॉण्ड ट्रान्सफर करून नागरिकांना पैसे मिळू शकतात. या निर्णयाला वेळ लागत आहे. त्यावर मार्ग काढण्याच्या सूचना पाटील यांनी प्रशासनाला केल्या.

समान पाणी पुरवठा योजनेची सद्यःस्थिती जाणून घेतली असून ही योजना पूर्ण होण्याची कालमर्यादा २०२३ पर्यंत आहे. योजनेला वेळ लागत आहे. किमान एखाद्या विधानसभा मतदार संघात योजना पूर्ण करून कार्यान्वित करावी अशा सूचना प्रशासनाला केल्या असून प्रशासनाने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाटील म्हणाले. या योजनेबाबत लोकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर करावी आशा सूचना त्यांनी यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांना केल्या.

Web Title: Will submit proposal to state government for boundary wall of societies in the city: Chandrakant Patil