शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Shivajinagar Vidhan Sabha: शिवाजीनगरला बंडखोरीचा परिणाम होईल का? काँग्रेस अन् भाजपही निवांत, लढत दुरंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:45 IST

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात काँग्रेस आणि भाजप दोघांनाही मताधिक्य असल्याने निर्णय मतदारांवर अवलंबून

पुणे : विधानसभेच्या रणधुमाळीत अर्ज दाखल करण्याची तारीख कालच संपली. आता प्रचाराच्या दृष्टीने उमेदवार कामाला लागले आहेत. ४ तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदतही देण्यात आली आहे. आता विधानसभा मतदार संघातून मुख्य लढत समोर आल्या आहेत. अशातच पुण्यातील शिवाजीनगर या एकमेव मतदार संघात काँग्रेस आणि भाजप निवांत असल्याचे दिसते आहे. कारण काँग्रेसपुढे बंडखाेरीचे आव्हान असले तरी त्याचा एवढा परिणाम निवडणुकीवर  होणार नसल्याची चिन्हे आहे. 

या मतदारसंघातही सन २०१९ ला झाली तशीच लढत पुन्हा हाेणार आहे. भाजपचे सिद्धार्थ शिरोळे मागील निवडणुकीत केवळ पाच हजार मतांनी विजयी झाले. त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या आग्रही भूमिकेमुळे पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. दुसरीकडे शिरोळे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून पक्षातीलच काहीजण साकडे घालून बसले होते, पण शिरोळे यांनी उमेदवारी मिळवलीच. आता साकडे घालणाऱ्यांनाच त्यांच्याबरोबर राहण्याशिवाय गत्यंतर नाही. उमेदवारी अर्ज दाखल करताना ते बरोबर होतेच. शिरोळे यांनीही ‘संपर्क नाही’ हा त्यांच्यावर लागलेले शिक्का मागील सहा महिन्यांत पुसून टाकला असल्याचे दिसते आहे. त्याचा त्यांना उपयोग होईल. काँग्रेसने इथेही बंडखोरी केली आहे. ती करणारे मनीष आनंद कँटोन्मेट मंडळाचे उपाध्यक्ष. शिवाजीनगर मतदारसंघात या भागाचा समावेश आहे, म्हणून त्यांचा उमेदवारीचा आग्रह व नाही मिळाली तर बंडखोरी. त्याचा किती परिणाम होईल याची काँग्रेस कार्यकर्त्यांनाच शंका. त्यामुळे काँग्रेसही निवांत व भाजपही निवांत.

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ कोणाचाही बालेकिल्ला मानला जात नाही. याठिकाणी मागील निवडणुकीत निवडून आलेला आमदार अवघ्या ५ हजारांनी जिंकला होता. तर २०१४ लाही भाजपने विजय मिळवला होता. २००८ च्या निवडणुकीत काँग्रेसने प्रचंड मताधिक्याने भाजपला पराभूत केले होते. या मतदारसंघात मतदारांप्रमाणेच उमेदवारही बदलले आहेत. मागील निवडणुका पाहता आगामी विधानसभा दुरंगी लढत होणार असल्याचे समजते आहे.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४shivajinagar-acशिवाजीनगरMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस