आरएसएसचा 'सरसंघचालक' हा मुसलमानांचा बनवणार का? पुण्यात संभाजी ब्रिगेडचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 11:55 AM2021-09-08T11:55:14+5:302021-09-08T11:55:24+5:30

राजकारण करण्यासाठी धर्म आडवा येत असेल तर आरएसएस च्या सरसंघचालक पदी 'महिला' बनवून दाखवा. असं ओपन चॅलेंज

Will RSS's 'Sarsanghchalak' be made for Muslims? Question of Sambhaji Brigade in Pune | आरएसएसचा 'सरसंघचालक' हा मुसलमानांचा बनवणार का? पुण्यात संभाजी ब्रिगेडचा सवाल

आरएसएसचा 'सरसंघचालक' हा मुसलमानांचा बनवणार का? पुण्यात संभाजी ब्रिगेडचा सवाल

Next
ठळक मुद्देनिवडणुकीत भावनिक राजकारण करून धर्मांध राजकारणी सत्तेची पोळी भाजून घेतात

पुणे : आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. या विधानामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय नेत्यांबरोबरच, संस्था आणि विविध संघटनांकडून भागवत यांच्यावर टीकाही होऊ लागली आहे. त्यातच पुण्यातील संभाजी ब्रिगेडनं  हिंदू मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. तर आरएसएसचा 'सरसंघचालक' हा मुसलमानांचा बनवणार का? असा सवाल उपस्थित केलाय.   

''मुळात यांना एवढ्या उशिरा हा शोध लागलाच कसा? भागवत साहेब, आरएसएसचा 'सरसंघचालक' मुस्लिम बनवून दाखवा. राजकारण करण्यासाठी धर्म आडवा येत असेल तर आरएसएस च्या सरसंघचालक पदी 'महिला' बनवून दाखवा. असं ओपन चॅलेंजही त्यांनी यावेळी दिलय.'' 

''धर्माचं परत राजकारण करू नका. कारण का बाबरी पाडली.? का लोकांची गरज जाळली.? का हे फक्त सुडाच्या राजकारणातून सत्तेचे राजकारण साधण्याचा प्रकार होता, हे भगवंतांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे. तुमच्या या वागण्यामुळेच, निवडणुकीच्या काळात देश संकटात येतो. दहशतवादी हल्ले होतात आणि निवडणुकीत भावनिक राजकारण करून धर्मांध राजकारणी सत्तेची पोळी भाजून घेतात असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. ''

आरएसएस आणि हिंदुत्ववादी विचारांनी आज पर्यंत हिंदू-मुस्लीम वाद लावून दंगली का घडवल्या

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात... 'हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते...' हा साक्षात्कार आहे की दृष्टांत. मग ज्या आरएसएस आणि हिंदुत्ववादी विचारांनी आज पर्यंत हिंदू-मुस्लीम वाद लावून दंगली का घडवल्या, समाजात समाजात सामाजिक तणाव निर्माण करून वातावरण गढूळ का केले. हजारों मुलांचे या धार्मिक दंगलीत जीव गेले मग त्यांना आजपर्यंत का भडकवले गेलं. का हजारो लोकांचे संसार देशात उद्ध्वस्त केले. अशी टीका यावेळी त्यांनी केली. 

धर्माच्या राजकारणाचा शेंडीने गळा कापला 

धर्माचं राजकारण करून सत्तेवर यायचं आणि सत्तेला सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे पूर्वज एकच आहेत हे सांगायचं हा खोटारडेपणा आहे. धर्मांध राजकारण करून आजपर्यंत धर्माधर्मात वाद कोणी वाद लावले. धर्माधर्मात दंगली कोणी घढवल्या.? कुणा मुळे 'हिंदू खतरे में हैं...' होता. हे भागवतांना सांगणार कोण.? मित्रांनो, धर्माच्या राजकारणाचा शेंडीने गळा कापला आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. असही ते म्हणाले आहेत. 

Web Title: Will RSS's 'Sarsanghchalak' be made for Muslims? Question of Sambhaji Brigade in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.